शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला 20 कोटी मिळाले; जूनपर्यंत 10 कोटी खर्चावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी केंद्राकडून ८६१.१४ कोटी रुपयांचा निधी मुक्त केला आहे. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगाकडून राज्य शासनाला प्राप्त निधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात येत आहे. या निधीतून सद्यपरिस्थितीचे विश्लेषण व गावांच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहे.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा दुसऱ्या हप्ता शासनाने नुकताच वितरण केला आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याला १९ कोटी ८१ लाख ३० हजार २८० रुपयांचा निधी प्राप्त झाला असून जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये १०:१०:८० या प्रमाणात वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील ५० टक्के निधी केवळ दोन महिन्यात खर्च करावा लागणार आहे. पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी केंद्राकडून ८६१.१४ कोटी रुपयांचा निधी मुक्त केला आहे. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगाकडून राज्य शासनाला प्राप्त निधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात येत आहे. या निधीतून सद्यपरिस्थितीचे विश्लेषण व गावांच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहे. त्यानुसार या निधीचा विनियोग करावा लागणार असून ५० टक्के निधी दोन महिन्यात खर्च करावा लागणार आहे. जर निधी वेळीच खर्च झाला नाही तर केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्ता मिळणार नाही. 

१६ कोटी ग्रामपंचायतींसाठी 

ग्रामपंचायतीसाठी १६ कोटी १४ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा निधी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता शासनाने वितरित केला आहे. ग्रामपंचायतींची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती व अन्य मापदंडानुसार हा निधी वितरित करण्यात येतो.

१ कोटी ८३ लाख जिल्हा परिषेदेसाठी

जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांना एकूण निधीच्या दहा टक्क्यांप्रमाणे एक कोटी ८३ लाख २९ हजार ९४७ रुपये इतका निधी वितरित केला आहे. सर्वाधिक निधी चिमूर पंचायत समितीला १८ लाख ३५ हजार ९९४ रुपये मिळाला आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुक्याला १६ लाख ५७ हजार ४६७ रुपये मिळाले आहेत. 

०५ कोटी पंचायत समित्यांसाठी

चंद्रपूर जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२१-२२ या पहिल्या आर्थिक वर्षाचा दुसरा हप्ता एक कोटी ८३ लाख २९ हजार ९४७ रुपये मिळणार आहे. हा निधी ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या आयसीआयसीआय बँकेतील खात्यात जमा करण्यात येणार आहे.

जूनपर्यंत ५०% खर्च न झाल्यास पुढील टप्पा नाही - केंद्रीय वित्त आयोग आणि पंचायतराज, नवी दिल्लीच्या निर्देशानुसार जून अखेरपर्यंत किमान ५० टक्के खर्च करणे आवश्यक आहे.- ५० टक्के खर्च केल्याशिवाय केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. खर्चाची जबाबदारी सीईओ यांच्याकडे आहे.

विकास आराखड्यानुसार करणार कामे पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२१-२२ या पहिल्या आर्थिक वर्षाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केलेल्या अनुदानातून घ्यावयाच्या कामांबाबत शासन निर्देश आहेत. तसेच निधीतून करावयाच्या कामांबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयानुसार करण्यात आल्या आहेत. या आर्थिक वर्षापासूनच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायत संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखड्यानुसार कामे करावी लागणार आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत