शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

वहिनीच्या साथीने मुलीने केली आईची हत्या; पुरावेही केले नष्ट अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 17:25 IST

निलेश्वर येथील घटना

सिंदेवाही (चंद्रपूर) : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून मुलीने वहिनीला सोबत घेऊन आपल्याच आईची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी गावातील स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कारही उरकले. मात्र, याबाबत दुसऱ्या मुलीने आपल्या आईचा घातपात झाल्याची तक्रार सिंदेवाही पोलिसात केली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले अन् ३ ऑक्टोबरला रात्री नलेश्वर येथे घडलेली घटना उजेडात आली.

तानाबाई महादेव सावसाकडे (६५, रा. नलेश्वर) असे मृतक महिलेचे नाव आहे. तानाबाई सावसाकडे हिचा मृत्यू झाल्यानंतर घरातीलच व्यक्तींनी तिची हत्या केल्याची तक्रार मृत महिलेची मुलगी रंजना रामेश्वर सोनवणे हिने सिंदेवाही पोलिसात केली. तक्रार प्राप्त होताच सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे यांनी पोलीस उपनिरीक्षक महल्ले यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तिथे जाऊन मृत महिलेची मुलगी वंदना खाते व सून चंद्रकला सावसाकडे यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान दोन्ही महिलांनी पोलिसांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता मुलगी वंदना हिने तिच्या आईला शेतजमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये वहिनी चंद्रकला हिला सोबत घेऊन नाक व तोंड दाबून हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंद करून दोन्ही महिलांना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर