शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
4
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
5
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
6
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
7
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
8
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
9
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
10
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
11
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
12
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
13
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
14
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
15
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
16
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
17
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
18
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
19
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
20
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारशा-मुंबई सेवाग्राम ही जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हक्काची असलेली एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली. ती अजूनही बंदच आहे. ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा साकडे घातले. मात्र मध्य रेल्वेने अजूनही ती सुरू केली नाही. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवासांना दिलासा देत मुंबईसाठी समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र तिला दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे. एवढेच नाही तर २८ मे ते २५ जूनपर्यंत केवळ पाच दिवसच ती चालणार आहे.बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी नुकतीच बल्लारशाह, चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशनची पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वी बल्लारशा येथून मुंबईसाठी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली केल्या. एवढेच नाही तर या ट्रेनचा टाईमटेबलही तयार करण्यात येऊन ट्रेन सोडण्याचा दिवसही ठरला. मात्र ट्रेन कुठे गेली,याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आता दक्षिण मध्य रेल्वेने समर ट्रेन सुरू केली. एका महिन्यामध्ये केवळ पाचवेळा ती चालणार आहे. त्यातच ती आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्याचे बराच वेळसुद्धा लागणार आहे.

आता आंदोलन हाच पर्पयाय

नुकतीच मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी बल्लारशा, चंद्रपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे संघटना, सामाजिक संस्थांनी निवेदन देत बल्लारशाह-मुंबई ही नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी लावून धरली. मात्र, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ट्रेनसाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

दक्षिणाला जमलं ते मध्य रेल्वे का नाही दक्षिण मध्य रेल्वेने  कसाबसा प्रयत्न करून किमान  समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र मध्य रेल्वेला बल्लारशाह स्टेशनवरून अधिक उत्पन्न असतानाही येथून थेट मुंबईसाठी ट्रेन सुरूच करता आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे