शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतून लागला सुगावा; वरोरात बनावट हापिंकची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:18 IST

पोलिसांची धाड : मुद्देमाल जप्त करून व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : शहरातील अनेक दुकानांत चक्क बनावट हार्पिक आणि लायझोलची विक्री सुरू असल्याचा सुगावा कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयास लागला. कंपनीच्या सल्लागाराने वरोऱ्यात येऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) रात्री दुकानांत धाड टाकली. या धाडीत ४६ हजारांचा बनावट मुद्देमाल जप्त करून तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आनंद किराणा शॉप, वानखेडे एजन्सी, अतुल प्लास्टिक, अशी दुकानांची नावे आहेत.

मागील दशकभरात वरोरा शहरातील बाजारपेठेचा मोठा विस्तार झाला. ठोक व्यापाऱ्यांची संख्या वाढली. अनेक व्यापारी दिल्ली, मुंबई व नागपूर शहरांतूनही मालाची ठोक खरेदी करू लागले. किराणा कापडपासून ते ट्रेडिंगच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मोठ्या महानगरांशी कनेक्टिव्हिटी वाढली. त्यातून नफा मिळविण्याच्या स्पर्धेत काहींनी अवैध मार्गाचाही वापर सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून असतो. अशा स्थितीत शहरातील आनंद किराणा शॉप, वानखेडे एजन्सी, अतुल प्लास्टिक या दुकानांत बनावट हार्पिक आणि लायझोल विक्री सुरू असल्याची माहिती व्यापारी वर्तुळात पसरली. ही बाब हार्पिक आणि लायझोल उत्पादन करणाऱ्या दिल्ली येथील कंपनीपर्यंत पोहोचली. त्यामुळे कंपनीच्या सल्लागाराने दिल्लीतून थेट वरोरा गाठले. गुरुवारी रात्री याबाबत तक्रार दाखल केली. रात्री तीन दुकानांवर छापा टाकण्यात आला. यामध्ये ४६ हजार रुपये किमतीचे बनावट हार्पिक आणि लायझोल आढळून आले. पोलिसांनी दुकानदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ६३, ६५ कॉपीराइट व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाई पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या नेतृत्वात विनोद जांभळे, भस्मे, मोहन निषाद दुधे, दिलीप सूर, मनोज ठाकरे आदींनी कारवाई केली. 

बड्या व्यापाऱ्यांचे नेटवर्क हार्पिक बनविण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड, हायड्रॉक्सिथिल ओलेमाइन, अमोनियम क्लोराइड, मिथाइल सॅलिसिलेट, ब्यूटिलेटेड हायड्रॉक्सिटोल्युइन, अॅसिड ब्लू २५, अॅसिड लाल ८८, डीआयोनाइज्ड व पाणी यासारख्या घटकांचा वापर केला जातो, अशी जाणकारांची माहिती आहे. मात्र, जप्त केलेल्या हार्पिकमध्ये या घटकांची कमतरता आहे. शिवाय, एका कंपनीच्या नावावर बनावट वस्तू विकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे यामागे बड्या व्यापाऱ्यांचे नेटवर्क असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठोक पुरवठादार नेमका कोण? वरोरा शहरात आढळलेली हार्पिक आणि लायझोल जिल्ह्यातील अनेक दुकानांत साठवून ठेवल्याची व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. या दोन्ही बनावट वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी एक मोठा व्यापारी दिल्ली व मुंबईशी संबंधित असल्याचे बोलले जाते. संबंधित कंपनीच्या सल्लागाराने वरोरा येथे तक्रार करून पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली. मात्र, या बनावट वस्तूंचा ठोक व्यापारी कोण, हे शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीchandrapur-acचंद्रपूर