शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिडिओंचा ताफा घेऊन सीईओ पोहचल्या डोंगळहळदी शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर     स्वच्छ,  शाळेची  दुरुस्ती आदी कामे त्यांनी  लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बोरांडे, सरपंच संगीता कुळमेथे, शिक्षक चिमूरकर यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रजी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळाही कुठेच कमी नसल्याचे चित्र  पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी तु, शाळेतील प्रगती बघितल्यानंतर दिसून येते. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे. डी. पोटे यांच्या प्रयत्नातून आणि लोकसहभागातून या शाळेचा कायापालट झाला आहे. या शाळेची प्रगती बघण्यासाठी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मिताली सेठी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील संवर्ग विकास अधिकाऱ्यांना घेऊन पोहचल्या. यामुळे तेथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अत्यानंद झाल्याचे मंगळवारी बघायला मिळाले.विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळा परिसर     स्वच्छ,  शाळेची  दुरुस्ती आदी कामे त्यांनी  लोकसहभाग मिळवून मुख्याध्यापक पोटे यांनी अवघ्या काही दिवसात शाळेची प्रगती करून दाखविली. त्यामुळे ही शाळा आता इतरांसाठी माॅडेल म्हणून समोर आली आहे. भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापक पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बोरांडे, सरपंच संगीता कुळमेथे, शिक्षक चिमूरकर यांच्यासह ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. शाळेच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग करून घेत असल्यामुळे प्रत्येक कामात ग्रामस्थ हिरहिरीने सहभाग घेत असल्याची यावेळी दिसून आले. सीईओंना शाळेत आणण्यासाठी बीडीओ धनंजय साळवे यांनी विशेष प्रयत्न केले. 

या अधिकाऱ्यांची हजेरीजिल्हा परिषद शाळा डोंगरहळदी तु. ला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येसीईओ मिताली सेठी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) कपिलनाथ कलोडे, भद्रावतीचे संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, वरोराचे संवर्ग विकास अधिकारी राजेश राठोड, चिमूरच्या संवर्ग विकास अधिकारी प्रणाली कोचरे, ब्रह्मपुरीच्या संवर्ग विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, सिंदेवाही संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, मूल संवर्ग विकास अधिकारी सुनील कारडवार, सावली येथील संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, पोंभूर्णा येथील संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, गोंडपिपरीचे शेषराव बुलकुंडे, राजुराचे किरणकुमार धनवडे, चंद्रपूरचे आशुतोष सपकाळ, जिवतीचे विजय पेंदाम, कोरपना येथील दिलीप बैलनवार आदींची उपस्थिती होती.

पहिल्यांदाच गावात सीईओ- पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी या दुर्गम गावामध्ये  आजपर्यंतच्या काळामध्ये एकदाही कोणत्याही सीईओंनी भेट दिली नाही. मात्र, सीईओ मिताली सेठी यांनी मंगळवारी शाळेची पाहणी  करण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मुख्याध्यापकांचे कौतुकशाळा परिसर स्वच्छ, बगीचा, निटनेटकेपणा, फूलझाले, विद्यार्थ्यांना आकलन होईल  अशी बाला पेंटिंग यासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता बघून सीईओंनी मुख्याध्यापक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे. डी. पोटे यांचे कौतुक केले.

लोकसहभागातून शाळा परिसर सुशोभित- जिल्हा परिषद शाळेला शासनाकडून पाहिजे तसा निधी मिळत नाही. त्यामुळे येथील मुख्याध्यापक पोटे यांनी    लोकसहभागातून शाळेचे सुशोभिकरण केले. एवढेच नाही तर प्रत्येक कामात नागरिकांचा सहभाग घेतला. त्यामुळे सध्या ही शाळा चकाचक झाली आहे.

विद्यार्थ्यांसोबत हितगूजशाळेत सीईओ पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम विद्यार्थ्यांसोबत हितगूज करीत त्यांना प्रथम बोलते केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मनमोकळेपणाने त्यांच्यासोबत संवाद साधला. दरम्यान, पहिल्या वर्गातील  विद्यार्थ्यांनी वाचून दाखविल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

टॅग्स :Schoolशाळा