शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दारू बाळगण्याच्या परवान्यावर दारू विक्रीचा व्यवसाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:22 IST

पोलिसांनाही गुंगारा : दारू विक्रेत्यांची नवी शक्कल; चौकशी व्हावी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : दारूच्या व्यसनाधीनतेने अनेक कुटुंबे उघड्यावर येत असून दारूमुळे अनेक समाजविघातक कृत्ये घडत असल्याने काही गावांत महिलांनी कंबर कसत गाव दारूमुक्त ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदीच्या गावातही दारू विक्रेत्यांनी नवी शक्कल लढवत दारू बाळगण्याची ऑनलाइन परवानगी काढून दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू ठेवल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विक्रेत्याजवळ एखाद्या वेळी दारू मिळाली तरी स्वतःला पिण्यासाठी आणली म्हणत कारवाईपासून पळ काढत आहेत. त्यामुळे या नव्या प्रकाराची चौकशी करून दारू विक्रेत्याच्या मुसक्या प्रशासनाने आवळाव्यात अशी मागणी महिला करीत आहेत. मूल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिघोरी गावात हा प्रकार सुरू असून दारू बाळगण्याच्या परवान्याआड सर्रास दारू विक्री होत असल्याने महिला हतबल ठरत आहेत. चौकशी करून कारवाई करावी अशी महिलांची मागणी आहे.

पोलिसांनी लक्ष देण्याची मागणीदारू बाळगण्याचा परवाना काढून गावात दारू विक्री केली जात असतानाही याबाबत पोलिस अनभिज्ञ कसे, असा प्रश्न आहे. पोलिस विभागाने आतातरी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

सोशल मीडियावर जाहिरातमद्यपान करणे आणि बाळगण्यासाठी ऑनलाइन परवाना काढून मिळेल. या आशयाखाली शासकीय आदेशानुसार दारू पिण्याचा परवाना आवश्यक आहे. दारू पिणे, खरेदी करणे, बाळगणे, वाहतूक करणे याकरिता एक दिवस किंवा कायमचे लायसन्स काढून मिळेल, अशी जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

"दिघोरी येथे महिलांच्या व तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने गाव दारूमुक्त आहे. मात्र, दारू बाळगण्याचा परवाना काढून गावात दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी."- अमोल वाकुडकर, पोलिस पाटील दिघोरी.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाchandrapur-acचंद्रपूर