शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ द्यावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:48 IST

रेती वितरणाचा सोमवार शेवटचा दिवस : प्रशासनाने रेती वितरणाची मुदत वाढवावी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : घरकूल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती मिळावी, म्हणून लाभार्थ्यांनी बराच आटापिटा केल्यानंतर प्रशासनाने घरकूल लाभार्थ्यांना मागणीनुसार रेती वितरण सुरू केले. मात्र, आठवडाभरातच रेती वितरणाची मुदत संपली असून, ९ जून सोमवारला सायंकाळी सहा वाजेपासून रेती वितरण बंद होणार असल्याने लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. घरकूल लाभार्थ्यांना रेतीवाटप केवळ ओटघटकेची ठरली आहे.

शासनाने घरकूल मंजूर केल्यानंतर रेतीघाट लिलाव केले नाही. परिणामतः लाभार्थ्यांची घरे अर्धवट राहिली. पूर्ण उन्हाळा रेती अभावी बांधकामे रखडली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेती उपलब्ध केली. मात्र, तीही काही दिवसच रेती वितरण केल्याने हजारो लाभार्थी रेतीपासून वंचित राहिले. परिणामतः घरकूल लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. 

मूल तालुक्यात नऊ रेती घाटांचे लिलाव झाले असून, तीन घाट घरकूल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवले गेले, तर लिलाव झालेल्या घाटांमधून १० टक्के रेतीसाठा घरकूल लाभार्थ्यांना देण्याच्या शासनाच्या वतीने तालुका प्रशासनाने आदेश काढले. मात्र, १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाचे दिवस असल्याने सदर उत्खनन बंद होणार असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे सोमवारपासून रेती वितरण बंद होईल.

तालुक्यातील डोंगरगाव, राजोली, कोसंबी, मूल, आकापूर, नलेश्वर मो, चक नलेश्वर, भेजगाव, हळदी, चक दहेगाव आदी घाटांचे लिलाव झाले असून, यातून प्रशासनाने ४० हजार ब्रास रेती उत्खनन करायची आहे. यापैकी घरकूल लाभार्थ्यांना जवळपास चार हजार ब्रास रेती राखीव आहे. मात्र, घरकूल लाभार्थ्यांना रेतीची उचल करण्याकरिता काही दिवसांचा कालावधी मिळाल्याने पाच टक्केही रेती सद्यःस्थितीत लाभार्थ्यांना वितरित झाली नाही. त्यामुळे हजारो घरकूलधारक रेती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारपासून रेती वितरण बंद झाल्यास लाभार्थ्यांचा हिरमोड होणार असल्याने रेती वितरणाची मुदत वाढवावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

१० टक्के रेतीसाठा घरकूल लाभार्थ्यांना देण्याच्या शासनाच्या वतीने तालुका प्रशासनाने आदेश काढले. मात्र, १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाचे दिवस असल्याने सदर उत्खनन बंद होणार असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे सोमवारपासून रेती वितरण बंद होईल.

रेती घाटाचे अंतर अधिक, भाडे न परवडणारेमूल तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना राखीव केलेल्या रेती घाटांचे व काही गावांचे अंतर जास्त असल्याने ट्रॅक्टर भाडे अधिक लागत आहे. परिणामतः शासनाची मोफत रेतीही लाभार्थ्यांना परवडणारी राहिली नाही. त्यामुळे गावाजवळ असलेल्या घाटातूनच रेती मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांची आहे.

"घर बांधकामासाठी उन्हाळ्यात रेती मिळाली नाही. परिणामतः घरकुलाचे बांधकाम रखडले. सद्यःस्थितीत रेती वाहतुकीसाठी वाहने मिळत नसून, दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांना रेती पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासनाने रेती वितरणाची मुदत वाढवावी."- एकनाथ शेंडे, घरकूल लाभार्थी, येजगाव

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgovernment schemeसरकारी योजना