शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणातील आरोपीने घेतली थेट तलावात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री १०.१० वाजता अचानक घडलेल्या  या घटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांना ५० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचखोर दोन्ही पोलिसांना अटक केल्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक चमूच्या ताब्यात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचा खडा पहारा होता. असे असतानासुध्दा राजेश त्रिकोलवार (५२) या आरोपीने लघुशंकेेचा बहाणा करून नगर परिषदेसमोरील तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री १०.१० वाजता अचानक घडलेल्या  या घटनेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. बल्लारपूर येथील एका व्यक्तीच्या तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कार्यालयासमोरील पानटपरीवर सापळा रचून लाच घेताना अटक करण्यात आली. राजेश त्रिकोलवार व सुधांशू मडावी (४५)  अशी आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये आणले. कारवाईसंदर्भात प्रक्रिया सुरू असतानाच अचानक लघुशंकेचा बहाणा करून आरोपी राजेश त्रिकोलवार याने पोलिसांनाच गुंगारा देऊन पळ काढला व आत्महत्या करण्यासाठी थेट नगर परिषदसमोरील तलावात उडी घेतली. तब्बल एक तास  आरोपी हा पाण्यात होता व त्याला वाचविण्यासाठी काहींनी उड्या घेतल्या. आरोपीला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण आरोपी बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर पोलीस संपत पुलिपाका यांनी त्याला समजावून बाहेर काढण्यात यश आल्याने पोलिसांना सुटकेचा श्वास घेतला.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस