शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटारे, नाल्यांची थातूरमातूर स्वच्छता

By admin | Updated: May 11, 2014 23:26 IST

चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही.

चंद्रपूर : चंद्रपूरकरांना ‘स्वच्छ चंद्रपूर आणि सुंदर चंद्रपूर’चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सत्तारूढ काँग्रेसचे शहराच्या विकासाकडे पाहिजे तसे लक्ष नाही. प्रशासनाचे तर केवळ दुर्लक्षच होत आहे. शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नाल्या, गटारी ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिकने तुंबल्या असून रस्त्यावरही घणकचर्‍याचे ढिगारेच बघायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी मनपाने गटारांची थातूरमातूर स्वच्छता करीत केवळ देखावा केला. अडीच वर्षापूर्वी चंद्रपूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूरकरांनी शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणे सुरू केले. मनपा अस्तित्वात आल्यानंतर सहा महिन्यानंतर मनपासाठी पहिली निवडणूक झाली. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी चंद्रपूरकरांना विकासाचे गाजर दाखवून मताचा जोगवा मागितला. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत शिवसेनेच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मात्र, विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास मागील दोन वर्षात सत्तारूढ काँग्रेस-शिवसेनेने चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास केला आहे. सुरूवातीच्या काळात रस्त्याच्या समस्येने चंद्रपूरकर चांगलेच हैराण झाले होते. आधीच खराब असलेले रस्ते, भूमिगत गटार योजनेमुळे आणखीच खराब झाले. रस्त्यामुळे चंद्रपूरकरांची सर्वत्र ओरड सुरू होताच दीड वर्षानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. मात्र, अजूनही शहरातील अनेक रस्त्यांची कामे शिल्लक असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील नाल्या, गटारीची भर पडत असून त्या ठिकठिकाणी तुंबल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एक महिन्यावर पावसाळा आला असताना मनपाने गटारे, नाल्या उपसण्याचे काम सुरू केले खरे; मात्र अगदी थातूरमातूर ही स्वच्छता दिसून येत आहे. ज्या ठिकाणाहून मोठे गटारे गेले आहेत. तिथे अनेकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे तिथे गाळ उपसलाच जाऊ शकत नाही. प्रत्येक वॉर्डात नाल्या, गटारी तुंबल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मोठी गटारे प्लास्टिक, कचर्‍याने तुंबले आहेत. पर्यायाने सांडपाणीच वाहून जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. मात्र, मनपाला, याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने अस्वच्छतेकडे किमान नगरसेवक, पदाधिकारी तरी लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गंजवॉर्डात अस्वच्छतेची समस्या गंभीर असून नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. आंबेडकर पुतळ्यापासून तर बिनबा गेटकडे जाणार्‍या मार्गावर हॉटेल मीडटॉऊनजवळ असलेल्या मोठ्या नाल्यामध्ये कचर्‍याचे मोठे ढिगारेच बघायला मिळतात. नाल्याच्या चोकअपमुळे मागील काही वर्षांपासून मोठा पाऊस पडला की शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत आहे. आझाद बाग, गिरनार चौक येथे दरवर्षीच अशी परिस्थिती बघायला मिळते. शहरातही काही ठिकाणी अशीच स्थिती असून याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)