शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:45 IST

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

ठळक मुद्देविद्यमान पदाधिकाऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना लक्षात घेता सदर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात राज्यातील जि.प. अध्यक्ष व सभापतींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सदर मागणी तत्वत: मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत सदर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले. या मागणी विषयीची भूमिका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विषद केली. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्वत: मान्य करत लवकरच आदेश निर्गमित करु असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात वर्धा जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, नागपूर जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, गडचिरोली जि. प. अध्यक्ष संगिता भांडेकर, जळगांव जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, औरंगाबाद जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगांवकर आदींची उपस्थिती होती.