शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची तहान भागविण्यासाठी दहा लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:47 IST

कधीकाळी ज्या नाल्यावर आपण पाण्यातील खेळ खेळलो, हसलो, बागडलो आणि शेतातील गव्हाला ओलित केले. आपल्या मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तृष्णातृप्ती केली. बालपण रम्य करणारा तो बारमाही वाहणारा कोंढा नाला परिसरातील कोळसा खदानींमुळे आज निर्जल होऊन एखाद्या वाळवंटासमान झाला.

ठळक मुद्देसंडे अँकर । ध्येयवेडे मत्ते यांचे कार्य प्रेरणादायी

यशवंत घुमे ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : कधीकाळी ज्या नाल्यावर आपण पाण्यातील खेळ खेळलो, हसलो, बागडलो आणि शेतातील गव्हाला ओलित केले. आपल्या मुक्या जनावरांना पाणी पाजून त्यांची तृष्णातृप्ती केली. बालपण रम्य करणारा तो बारमाही वाहणारा कोंढा नाला परिसरातील कोळसा खदानींमुळे आज निर्जल होऊन एखाद्या वाळवंटासमान झाला. तेथे औषधालाही पाणी उरले नसल्याने गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ही खंत वयाची पासष्टी पार केलेल्या आयुध निर्माणी शस्त्र कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या पुरुषोत्तम मत्ते यांच्या मनात आली. परंतु नेमके काय केले तर गावाचा हा पाणी प्रश्न सुटेल, याची दिशा त्यांना गवसत नव्हती. एके दिवशी भद्रावती येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांचे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते ऐकायचा योग आला आणि त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली.सतत दोन वर्षे पाऊस पडला नाही तरी ग्रामस्थांची तहान भागविण्याची व शेत पिकांचे सिंचन भागविण्याची क्षमता त्यांनी उभारलेल्या छोटया छोटया बंधाºयात आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी जमिनीत मुरवून जमिनीचा जलस्तर उंचावण्यासाठी खानापूरकरांचा शिरपूर पॅटर्न महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. टंचाईग्रस्त भागातील गावखेडयांना आशेचा किरण दाखवणाºया त्यांच्या व्याख्यानाने मत्ते यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली. त्यांनी सुरेश खानापूरकर यांच्यासोबत व्यक्तिगत सलगी वाढवून व सल्ला घेऊन शिरपूर पॅटर्नप्रमाणे आपल्या कोंढा गावी असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्याचा निर्धार मनाशी बांधला. यासाठी त्यांनी सर्वप्रथम गावकऱ्यांना विश्वासात घेतले. शासनाकडून काहीतरी मदत मिळेल, या अपेक्षेने चार वर्षे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे उंबरठे झिजवले. परंतु शेवटपर्यंत यापैकी कोणीही त्यांच्या मदतीला धावले नाही. तरीही त्यांनी माघार घेतली नाही. आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड सगळ्यांची येणारी शासकीय अनास्था बघून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर वार्धक्यासाठी जन्मभर राखून ठेवलेल्या जमापूंजीच्या भरोशावर बॅकांकडून दहा लाख रुपयांचे कर्ज काढले. अन त्या रकमेतून गावकºयांसाठी कोंढा नाल्यावर बंधारा बांधण्याचे काम सुरू केले. जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा करून खोलीकरण केले. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ठिकाणी शंभर मीटर लांब, पस्तीस ते चाळीस फुट रूंद आणि वीस फुट खोल असे नाला खोलीकरणाचे काम पूर्ण केले आहे.आजच्या स्वार्थी जगात माणूस पैशाच्या मागे धावत असताना एका सेवानिवृत्त कर्मचाºयाने केवळ गावकºयांच्या चेहºयावरील निखळ आनंद बघण्यासाठी निर्लेप भावनेने वार्धक्याच्या सुरक्षितेसाठी ठेवलेली जमापूंजी बॅकेकडे गहाण ठेवून सामाजिक दायित्व निभावले. याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहे. समाजभावनेने प्रेरित होऊन या ध्येयवेड्याने केलेल्या अलौकिक कार्याने परिसरात ते आदर्श झाले असून प्रेरणादायी ठरले आहे. या कामात त्यांना त्यांची अर्धांगिनी शोभा यांनीही तितकीच भक्कम साथ देऊन आदर्श पत्नीधर्म निभावला, हे विशेष.

टॅग्स :water shortageपाणीकपात