शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आदिवासींना तेलंगणा वनविभागाकडून पेरणीस नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 14:31 IST

जागेवर दाखविला हक्क : महाराष्ट्र महसूल विभागाने दिले आहेत जमिनीचे पट्टे

बी. यू. बोर्डेवार लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा (चंद्रपूर): सीमावर्ती जिवती तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून जमीन पट्टे वितरित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित जमिनीवर तेलंगणावनविभागाने आपला हक्क सांगत पेरणीस मज्जाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चंद्रपूर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत समस्या लवकरच सोडवली जाईल, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.

जिवती तालुक्यातील हिरापूर खडकी हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील वादग्रस्त १४ गावांच्या यादीतील परिस्थिती येथेही दिसून येत आहे. येथील शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून जमिनीचे पट्टे मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली असतानाच तेलंगणाच्या वनअधिकाऱ्यांनी या जमिनीवर वृक्षारोपण केले जाईल, तुम्ही जागा रिकामी करा, असा इशारा दिला.

या पार्श्वभूमीवर हिरापूर खडकीचे सरपंच सीताराम मडावी, पोलिस पाटील जंगू सोयाम, तिरुपती पोले, शिवाजी पोले, शेषराव सुरनर, केशव सुरनर, शिवाजी देवकते, नामदेव सुरनर, गणेश पोले, विठ्ठल बिडकर आदींनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेत त्यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले. माजी आमदार धोटे यांनी चंद्रपूर वनविभागाचे अधिकारी व विरुर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश दिघे यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या समस्येची दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. महाराष्ट्र वनविभागाने आश्वासन दिले. पण, अजूनही ठोस पाऊले उचललेली नाहीत. त्यामुळे हिरापूर खडकी येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.

"तेलंगणाच्या सीमेवरील जिवती तालुक्यातील हिरापूर खडकी येथील आदिवासी शेतकरी बऱ्याच वर्षापासून शेती करीत आहेत. महाराष्ट्राने त्यांना जमिनीचे पट्टे दिले. मात्र, तेलंगणा वनविभागाने मनाई केली. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची तत्काळ दखल घ्यावी."- सुभाष धोटे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीforest departmentवनविभागTelanganaतेलंगणा