शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुकूम जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:40 IST

येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील जलशुध्दीकरण यंत्रात शुक्रवारी तांत्रिक बिघाड आला. यामुळे आज शनिवारी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. ऐन उन्हाळ्यात आणि तेही कोणतीही पूर्वसूचना नसताना नळाला पाणी न आल्याने चंद्रपूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला.शुक्रवारी तुकूम येथील जलशुध्दीकरण यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. सध्या चंद्रपुरात सूर्य आग ओकत आहे. सातत्याने महिनाभर पारा ४५ अंशाच्या वर असल्यामुळे शहरातील विहिरी, बोअरवेल आटल्या आहेत. नागरिक पाण्यासाठी इतरत्र भटकत आहेत. दरम्यान, शनिवारी चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. दैनंदिन कामावर परिणाम झाला. आधीच विहिरी, बोअरवेलला पाणी नाही. नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. अशात नळही येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना कुलर बंद ठेवून रहावे लागत आहे.बिघाड तात्काळ दुरुस्तशनिवारी नळ आले नाही. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता मनपा आयुक्त संजय काकडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी, रवींद्र कळंबे, नरेंद्र पवार, अतुल टिकले यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी अहोरात्र काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. येत्या १-२ दिवसात संपूर्ण चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. कधी तांत्रिक बिघाडामुळे समस्या उदभवते. त्यासाठी पालिका अधिकारी-कर्मचारी वर्ग दिवसरात्र कार्यरत आहेत. पाणीपुरवठयासाठी मनपा कटीबद्ध आहे, नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे.- संजय काकडे, आयुक्त, मनपा चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी