शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिवतीतील शाळांना शिक्षकांचे ‘नो लाईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:21 IST

अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळांची अवस्था : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार

संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस असतानाही येथील शाळांमध्ये शिक्षक रुजूच झाले नाहीत. पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षण विभागाने जवळच्या शाळेतील शिक्षकांना त्या शाळेत प्रतिनियुक्ती देऊन शाळा उघडल्याचा प्रकार शाळेच्या पहिल्या दिवशी घडला.जिवती तालुक्यात काही शासकीय नोकरदार सेवा करण्यात नाखूश आहेत, याची प्रचिती यावरुन दिसून येते. शिक्षकांच्या यावर्षीच्या बदली प्रक्रियेत जिवती तालुक्यातून २४६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यांच्या जागी जवळपास २१५ शिक्षक रुजू झाले. यात ३१ शिक्षकांची आणखी आवश्यकता आहे. मागील वर्षी विषय शिक्षकांच्या बदल्यात जिवतीवरुन विषय शिक्षक बदली झालेत. परंतु, दुसरे विषय शिक्षक अजूनही सुरू झालेले नाहीत. केवळ १० विषय शिक्षक रुजू झाले असून आजही ५० विषय शिक्षकांचा अनुशेष आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया ही आॅनलाईन राबविण्यात आली. मात्र जिवती तालुक्यातील येरव्हा, राहपल्ली (बु.) पळसगुडा, पाटागुडा, महाराजगुडा, कोलामगुडा, शेडवाही, टाटाकोहाळ, भुरी येसापूर येथील शाळांना पसंती दिली नाही. २६ जूनला शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळात प्रतीनियुक्तीवर जवळच्या शाळेतील शिक्षक पाठविण्यात आले.तालुक्यातील अनेक शाळेत चार ते पाच शिक्षकांची आवश्यकता असताना, त्या शाळेत केवळ एकच शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत. तर ‘त्या’ नऊ शाळांमध्ये शिक्षकच रुजू झाले नाही तर शाळाच बंद करण्याची वेळ तर येणार नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.रुजू झाले आणि वैद्यकीय रजेवर गेलेबदली प्रक्रियेनंतर तालुक्यात अनेक शाळांत शिक्षक रुजू झालेत. परंतु, आल्याआल्याच वैद्यकीय रजा घेऊन निघून गेलेत. वैद्यकीय रजा घेऊन अनेकांनी काढता पाय घेतल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मोठ्या शाळा ओसतालुक्यात शिक्षक रुजू न झाल्यामुळे तसेच रुजू झालेले शिक्षक वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे मोठ्या जि. प. शाळा ओस पडल्या आहेत. कुंबेझरी येथील डिजिटल शाळा, सेवादासनगर, येल्लापूर या मोठ्या शाळांत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थीही येत नाही.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक