शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्य करणे गरजेचे!

By admin | Updated: January 18, 2017 00:48 IST

विद्यार्थ्यांना संस्कारक्षमत बनविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते.

शोभाताई फडणवीस : मूल येथे शालेय क्रीडा स्पर्धामूल : विद्यार्थ्यांना संस्कारक्षमत बनविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षकांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून कार्य केल्यास विद्यार्थ्यांच्या प्रगती शक्य आहे. शिक्षणाबरोबरच क्रीडा विषयक खेळाबाबतही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी घडविताना शिक्षणाबरोबरच क्रीडाची जोड द्यावी, असे प्रतिपादन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, न.प.चे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती मिलिंद खोब्रागडे, संस्थेचे सचिव माणिकराव जगताप, माजी प्राचार्य शशीकांत धर्माधिकारी, पत्रकार प्रा. चंद्रकांत मनियार, नगरसेवक अजय गोगुलवार, पं.स. मूलचे माजी उपसभापती अमोल चुदरी, माजी नगरसेविका लिना बद्देलवार, प्रशांत बोबाटे, मनीष येलट्टीवार, सुनील गायधने, जयंत मोरांडे, विलास अलगमवार, अशोक मेश्राम, मुख्याध्यापक अविनाश जगताप, पत्रकार रमेश माहुरपवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी शाळेतील स्काऊट अ‍ॅड गाईडच्या विद्यार्थ्यांतर्फे पाहुण्यांना सलामी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत गीताबरोबरच विविध नृत्याचे उपस्थितांचे मने वेधून घेतली. अध्यक्षस्थानावरुन नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध छोट्या-छोट्या कथा सांगून उद्बोधन केले. माजी प्राचार्य धर्माधिकारी व पत्रकार चंद्रकांत मनियार यांनी विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना बौद्धीक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी शाळेत राबवित असलेल विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या बौद्धीक ज्ञानाला चालना देण्यासाठी शाळा अविरत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे सहायक शिक्षक बंडू अल्लीवार तर उपस्थितांचे आभार सहायक शिक्षिका रीना मसराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पदविधर शिक्षक राजू गेडाम, सहायक शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, अंजली जगताप, अजय राऊत, सर्व पालक व नागरिकांनी विशेष सहकार्य देऊन परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)