मागण्यांची पूर्तता करा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुलै महिन्याचे नियमित वेतन देयक वार्षिक वेतन वाढीशिवाय स्विकारण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना संघटनेचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात गुरुवारी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये सन २०१७ चे जुलै महिन्याचे नियमीत वेतन देयक वार्षिक वेतन वाढीशिवाये स्विकारण्यात येऊ नये, वैद्यकीय देयक, पदोन्नती, निवृत्ती प्रस्ताव, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आदी मागण्याचा समावेश आहे.या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, सुनील शेरकी, प्रमोद कोंडस्कर उपस्थित होते.
शिक्षकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 00:44 IST