शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जिल्हा परिषदेच्या विसंगत कारभारामुळे शिक्षक त्रासले

By admin | Updated: February 25, 2016 00:58 IST

महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा राज्य सल्लागार एन. जी. तुर्के हे उपस्थित होते.

तुर्के यांचा आरोप : पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभाचिमूर : महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा राज्य सल्लागार एन. जी. तुर्के हे उपस्थित होते. ही सभा शिक्षक सहकारी पतसंस्था चिमूर येथे घेण्यात आली. यावेळी राज्य प्रमुख संघटक एन. आर. कांबळे, एन. डी. मुंगले, हरिश्चंद्र कामडी, ता.रा. दडमल, रवी वरखेडे, गंगाधर भैसारे, पांडुरंग मेहरकुरे प्रामुख्याने उपस्थित होते. तालुका स्तरावरील तथा जिल्हा स्तरावरील समस्यांबाबत शिक्षक प्रतिनिधींनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कुठल्याही कार्यालयातील कर्मचारी पैशाशिवाय काम करीत नाही, पैसे दिले की, कोणतीही त्रुटी काढत नाही. मात्र पैसे न दिल्यास अनेक प्रकारचे कारणे दाखवून समस्या प्रलंबित ठेवतात. कोणाचेही काम पैशाने लवकर होते. ज्यांनी पैसे दिले नाही. त्यांना एक वर्ष, दीड वर्ष वाट पाहावी लागते. असे शासनाचे दुटप्पी धोरण आहे. या धोरणाला शिक्षक वर्ग त्रासून गेले आहे. तेव्हा संघटनेने योग्य पाऊल उचलून समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत एन.जठी. तुर्के यांच्यासह अनेकांनी व्यक्त करुन प्रशासनाविषयी संताप दर्शविला.याचवेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना राज्य सल्लागार एन. जी. तुर्के यांनी संघटनेचे ब्रिदवाक्य न्यायाची चाड, अन्यायाची चिड, तप- ज्ञान- सेवा या ब्रिदाला अनुसरुन शिक्षकांनी तयार होवून न्यायासाठी लढा दिला पाहिजे. प्रशासनात काम करणारी माणसे योग्य प्रकारचे नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारामध्ये विसंगती निर्माण होत आहे. त्याचा फटका सर्वसाधारण शिक्षकाला निर्माण होत आहे. दहा शिक्षकांना एकाच वेळी न्याय मिळाला पाहिजे. परंतु तसे न घडता ज्यांनी पैशाचा वापर केला. त्याला अगोदर न्याय व ज्यांनी पैशाचा वापर केला नाही, त्यांना उशिरा न्याय, अशीच विसंगती पंचायत समिती व जिल्हा परिषदेत घडून येत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे लढा उभारणे हे शिक्षकांसाठी हिताचे आहे, असे मत तुर्के यांनी व्यक्त केले.सभेचे प्रास्ताविक एम. के. दडमल यांनी केले. संचालन विनोद महाजन यांनी केले. आभार रवी वरखेडे यांनी मानले.यावेळी संघटनेचे काही पदे भरण्यात आली. या सभेला आर. एस. चांदेकर, डी. बी. चव्हाण, ए. एम. मडावी, डी. पी. गुडधे, एम. व्ही. नन्नावरे, ए. पी. ठोंबरे, पसारे, कऱ्हाडे, ढोक, भैसारे, पुरुषोत्तम पंधरे, सी.आर. मुळे, राजू कापसे, सिडाम, ठाकरे, गणवीर, एम. आर. शेडामे, केदार, नकाते, गौरकार, गुडधे, मुरकुटे, डी.सी. खोब्रागडे, आर. जी. नन्नावरे, जे. ए. गाठे, मंगाम तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)