शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

८५ हजार मालमत्ताधारकांची करवसुली १३ लिपिकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:53 IST

चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील तीन झोनमध्ये ८५ हजार ४९६ मालमत्ताधारकांची संख्या आहे. मात्र, कर वसुलीची जबाबदारी केवळ १३ लिपिकांच्या खांद्यावर असल्याने मनपाला २०१८-१९ या आर्थिक वर्षातही उद्दिष्ट गाठण्याची शक्यता कमीच दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील तीन झोनमध्ये ८५ हजार ४९६ मालमत्ताधारकांची संख्या आहे. मात्र, कर वसुलीची जबाबदारी केवळ १३ लिपिकांच्या खांद्यावर असल्याने मनपाला २०१८-१९ या आर्थिक वर्षातही उद्दिष्ट गाठण्याची शक्यता कमीच दिसते. प्रशासकीय आणि विकास कामांवर होणाऱ्या खर्चात समतोल ठेवायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीत कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रियता मिळविणाºया योजनांची घोषणा वेगळीे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आर्थिक जुळवाजुळव करणे या दोन्ही बाजू करवसुलीविना शक्यच नाही. पण मनपा प्रशासनाचे घोडे नेमके येथेच पेंड खात असल्याने यावर्षीदेखील तिजोरीत खडखडाट राहण्याचीच शक्यता अधिक आहे.चंद्रपूर महानगरपालिकेच्या एकूण तीन झोन आहेत़ पहिल्या झोनमध्ये ३१ हजार ७६८ मालमत्ताधारक, झोन क्रमांक दोनमध्ये २३ हजार ३२९ आणि तिसऱ्या झोनमध्ये ३० हजार ३९९ असे एकूण ८५ हजार ४९६ मालमत्ताधारक शहरात आहेत़ मालमत्ता, शिक्षण, रोजगार हमी कर, वृक्षकर, अग्निशमन, स्वच्छता शुल्क, जाहीरात कर, बाजार भाडे आणि व्याज वसुली करण्यासाठी मनपाच्या कर विभागात मुबलक मनुष्यबळाची गरज आहे.मनपामध्ये सद्यस्थितीत सुमारे ६५० कर्मचारी कार्यरत आहेत़ तब्बल ४२५ कर्मचारी स्वच्छता विभागाशी संबंधित आहेत़ त्यामुळे केवळ २२५ कर्मचारी प्रशासकीय कामकाज सांभाळतात़ यामध्ये ६० कर्मचारी लिपिक संवर्गातील आहे. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने विविध विभागांची कामेही त्यांच्यावर थोपविल्या जातात़ जानेवारी ते जून २०१८ दरम्यान १८ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. जुलै महिन्यात चार कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाचो आर्थिक गाडा चालविण्यासाठी मालमत्ताधारकांकडून कर वसुली करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ ठेवावे लागेल. शहरातील ८५ हजार ४९४ मालमत्ता धारकांकडे कर वसुली करण्यासाठी केवळ १३ कर्मचारी उपलब्ध असल्याने प्रचंड दमछाके होत आहे. दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लिपिक संवर्गातील कर्मचारी थकबाकीदारांकडे चकरा मारत आहेत. मालमत्ता धारकांकडून एकूण मागणी ३९ कोटी ६६ लाख ८१ हजार ८२४ रुपयांची असून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १३ कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. १ एप्रिल ते १६ जुलै २०१८ पर्यंत केवळ ३.५५ टक्के कर वसुली होऊ शकली. स्वच्छता करदेखील ३.५ टक्क्यांपलिकडे पोहोचू शकला नाही.नव्या आकृत्तीबंधाशिवाय पर्याय नाहीचंद्रपुरात नगरपरिषद अस्तित्वात असताना १ हजार १७८ पदे कार्यरत होती. महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे तेवढ्याच पदांना मान्यता द्यावी, यासाठी अहवाल पाठविला होता. परंतु शासनाने ८६९ पदांच्या आकृत्तीबंधाला मंजुरी दिली. त्यामुळे करविभागासोबत सर्वच विभागांमध्ये अल्पमनुष्यबळावर कारभार हाकावा लागत असल्याने मनपाने नव्या आकृतीबंधासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला तरच संकटांवर मात करता येऊ शकेल.

टॅग्स :Taxकर