शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

उद्दिष्ट एक हजार कोटी, कर्जवितरण फक्त २३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली.

ठळक मुद्देबँकांचा हात आखडता : खरिपासाठी पीककर्ज मिळाले नाही तर दुष्काळ उगवणार !

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण कृषी अर्थकारणाची चाके दुष्टचक्रात रूतली असतानाच कोरोना लॉकडाऊनमुळे ती आणखी खोलात गेली. खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. आता खरीप हंगामासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरीपीक कर्जाकरिता बँकांकडे चकरा मारत आहेत. जिल्ह्याला यंदा एकहजार कोटींचे उद्दिष्ट मिळाले. मात्र, कर्ज वितरणासाठी बँकांनी हात आखडता घेतल्याने एप्रिलपर्यंत केवळ २३ कोटी २९ लाख १३ हजारांचेच कर्ज वितरण होऊ शकले. त्यामुळे कर्ज वितरणाची गती वाढवून आर्थिक कोंडी दूर केली नाही तर खरीप हंगामात ‘दुष्काळ’ उगवण्याचा धोका शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.पाच वर्षांपासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अधिनस्थ विविध कार्यकारी संस्थांचे जाळे ग्रामीण भागात पसरल्याने बहुतांश शेतकरी या संस्थांकडून पिककर्ज घेतात. तुलनेने राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्जासाठी अर्ज करणाºया शेतकºयांची संख्या कमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार बँकांनी कर्ज वितरणाची तयारी सुरू केली. २० एप्रिलपर्यंत २३ हजार कोटी २९ लाखांचे कर्ज वितरण झाले. दरम्यान, २४ एप्रिलला लॉकडाऊन सुरू झाल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने जीवनाश्यक वस्तु व सेवांचा अपवाद वगळून सर्व क्षेत्रांवर प्रतिबंध घातला. सोशल डिस्टन्सचे पालन करून बँकांचे व्यवहार सुरू ठेवण्यात आले. मात्र, खरीप कर्जासाठी अर्ज स्वीकारणे, मंजुरी देणे व वितरणाची व्यवस्थाच विस्कळीत झाली. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्याने बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. परंतु, पिककर्ज प्रकरणांना मंजुरी देण्याची प्रक्रिया अद्याप गतिमान झाली नाही. त्यामुळे पैशाअभावी शेतकरी धास्तावले आहेत.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आघाडीएप्रिल २०२० पर्यंत ३ हजार ९८० शेतकऱ्यांना २३ कोटी २९ लाख १३ हजारांचे खरीप पीक कर्ज वितरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांमार्फत सर्वाधिक १८ कोटी ८३ लाख ९९ हजारांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत केल्याचे पुढे आले आहे.राष्ट्रीयीकृत बँकांचा ताठरपणा मुळावरराष्ट्रीयीकृत बँकांनी एप्रिल २०२० पर्यंत एकून उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे चार कोटींचेच पिककर्ज वाटप केले. यंदाच्या खरीप हंगामाच्या आगमाची स्थिती बघता वितरण केलेल्या कर्जाची टक्केवारी चिंताजनक आहे. रब्बी व खरीप हंगामात कर्ज वितरण करताना राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वीकारलेला ताठरपणा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविणारा असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.व्याज परताव्याबाबत संभ्रमपीककर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकऱ्यांना केंद्राकडून ३ टक्के व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. परंतु, केंद्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार अल्प मुदत खरीप पिककर्जाची परतफेड ३१ मे २०२० पर्यंत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच केंद्राचा ३ टक्के व्याज परतावा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १ जून ते ३० जून २०२० या कालावधीत बँकांच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे व्याज भरावा लागणार आहे. शेतकरी सभासदानाही एक महिन्याचा व्याज परतावा मिळणार नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळावीशंकरपूर : लॉकडाऊनमुळे बँकेतून पिककर्ज घेण्यासाठी हिस्सेदारांच्या स्वाक्षरी आणण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करताना हिस्सेदाराच्या स्वाक्षरीची अट वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँक व सोसायटींमार्फत सुरू आहे. कर्जासाठी सातबारा नमुना आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड द्यावा लागतो. परंतु सातबारावर एकापेक्षा जास्त नावे असल्यास १०० रूपयांच्या मुद्रांकावर संमतीपत्र देण्याचा नियम आहे. बँक निरीक्षकासमोर उपस्थित राहून स्वाक्षरी केली तरच कर्ज मिळते. बऱ्याच शेतकऱ्यांचे भाऊ, बहीण, आई-वडील लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना निरीक्षकांसमक्ष स्वाक्षरीच्या अटीतून वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज