शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तारण योजना ठरली शेतकर्‍यांना तारक

By admin | Updated: May 25, 2014 23:27 IST

गोंडपिपरी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शेतमाल तारण योजनेंतर्गत १८६२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४ हजार ५७१ एवढा भाव मिळाल्याने तारण लाभार्थी

धाबा : गोंडपिपरी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये शेतमाल तारण योजनेंतर्गत १८६२ क्विंटल सोयाबीन तारण ठेवणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४ हजार ५७१ एवढा भाव मिळाल्याने तारण लाभार्थी शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सुरुवातीला व्यापार्‍यांना सोयाबिन विकणारे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीने १ डिसेंबर २0१३ पासून सोयाबीन शेतमालासाठी तारण योजना सुरु केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील शेतकर्‍यांनी १ हजार ८६२ क्विंटल सोयाबिन समितीत तारण ठेवले. या सोयाबिनचा लिलाव करण्यासाठी बाहेरील व्यापार्‍यांना पाचारण करण्यात आले होते.

मालाची अ ग्रेड, ब ग्रेड, क ग्रेड अशी प्रतवारी करण्यात आली. लिलावात चढय़ा बोलीनुसार अ ग्रेडकरिता ४ हजार ५७१ प्रतिक्विंटल, ब ग्रेडसाठी ४ हजार ५४६ प्रतिक्विंटल तर क ग्रेडसाठी ४ हजार ३२६ प्रतिक्विंटल एवढा भाव स्नेहा प्लांट व मध्य प्रदेशाच्या व्यापार्‍यांनी दिला. त्यामुळे २ हजार २00 ते २ हजार ८00 रुपये प्रतिक्विंटल भावाने स्थानिक व्यापार्‍यांना ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी करण्याकरिता सोयाबिन विक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले तर तारण योजनेमध्ये शेतमाल ठेवणार्‍या शेतकर्‍यांना ही योजना तारक ठरली आहे. येणार्‍या वर्षात तरी शेतकर्‍यांनी सोयाबिन तारण योजनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवावे, अशी विनंती सचिव जितेंद्र सोनटक्के, सभापती राजीवसिंह चंदेल यांनी केली आहे. सोयाबिनवगळता इतर पिकांसाठीही तारण योजना ३१ ऑगस्ट २0१४ पर्यंत सुरु असून सोयाबिनसह तारण योजनेत इतर माल देणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर विविध बक्षिसे बाजार समितीने जाहीर केली आहेत. तसेच शेतकर्‍यांसाठी १८ जानेवारी २0१४ पासून बैलबाजारालाही सुरुवात केली आहे. लाभ घेण्याची विनंती समितीतर्फे करण्यात आली. (वार्ताहर)