रंगारंग कार्यक्रमांचा महिलांनी घेतला आस्वाद : समूह व युगल व नाटिकांची धमालमूल : लोकमत सखी मंच मूल, निर्मल कपडा बाजार मूल व प्रगती अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को- आॅप. सोसायटी मूल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सखी महोत्सव उत्साहात पार पडला. रामलिला भवन येथे आयोजित तालुकास्तरीय सखी महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा रिना थेरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कर्मवीर महाविद्यालय मूलच्या प्राध्यापिका डॉ. अनिता वाळके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दत्तगुरु साई माँ शिक्षण शारम महाविद्यालयाच्या प्राचार्य रत्नमाला भोयर, अनिता मोगरे, हेमा कासर्लावार, स्कूल आॅफ स्कॉलरच्या संतोषी खेवले, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे, सखी मंच भद्रावतीच्या संयोजिका अल्का वाटेकर, मूलच्या तालुका संयोजिका जयश्री चन्नुरवार, निर्मल कपडा बाजार मूलच्या वर्षा पडगेलवार, प्रगती अर्बन को- आॅप सोसायटी मूलच्या कविता आक्केवार आदी मंचावर उपस्थित होत्या.तालुकास्तरीय सखी महोत्सवात समूह व युगल नृत्य व नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी नाटिका स्पर्धेत प्रथम ‘हगणदारी मुक्त’ ग्रुपला तर द्वितीय ‘अडाणी शांताबाई’ ग्रुपला प्राप्त झाला. समूहनृत्य स्पर्धेत प्रथम ‘ईडापिडा टाकून दे बळी राजा येऊ दे’ तर द्वितीय ‘कोळी वाल्याची शान आई तुझ देऊन’ तर तृतीय देवा ‘तुझ्या गाभाऱ्यात डंबराच नाही’ या नृत्याला मिळाला. युगल नृत्य स्पर्धेत प्रथम माळ्याच्या माध्यामध्ये तर द्वितीय ही पोरगी साजुक तुपातली तर तृतीय वंदे मात्रम या देशभक्तीपर नृत्यास प्राप्त झाला. विजेत्या स्पर्धकांना सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम, तालुका संयोजिका जयश्री चन्नुरवार, प्राचार्या रत्नमाला भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस देऊन गौरविण्यात आले. संचालन राजश्री मुस्तीलवार, मिनाक्षी ढोकर, संजीवनी वाघरे, प्रास्ताविक तालुका संजोजिका जयश्रीे चन्नुरवार तर आभार शारदा कुशमराव, मंगला गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मिता गुरुनुले, मनिषा सिरस्कर, कल्पना मेश्राम, शिल्पा वैद्य, गीता चन्नावार, सपना निमगडे, संगीता वाळके, वर्षा नन्नावरे, सुजाता बरडे, वैशाली संतोषवार आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)आज सखींचा संक्रांत उत्सव विविध स्पर्धा : प्रथम उपस्थिती दर्शविणाऱ्यांसाठी विशेष लकी ड्रॉ चंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूर आणि आयएमए असोसीएशन चंद्रपूर तसेच सुहाना मसाले चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारीला स्थानिक आयएमए सभागृह सरदार पटेल महाविद्यालय गंज वॉर्ड चंद्रपूर येथे दुपारी १२ वाजेपासून संक्रात उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रक्तदाब तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयएमएच्या वतीने विशेष आयोजन करण्यात आले असून यावेळी सौंदर्य तज्ञ डॉ. स्नेहल पोटदुखे सौंदर्यविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मधुमेह व ह्दय तज्ञ डॉ. प्रसाद पोटदुखे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाकरिता सर्व सखींनी महाराष्ट्रीयन पोषाख परिधान करून यायचे असून यावेळी सर्व सखी मंच सभासदांनी सहभागी व्हायचे आहे. संक्रांती निमित्त हळदी-कुंकू तसेच १ मिनीट गेम शो, सामुहिक खेळ, सरप्राइज गेम्स, फुगडी, बहुरंगी-बहुढंगी संक्रातीचा सण (माहितीपर स्पर्धा पंतग बनवा स्पर्धा, साहित्य स्वत: आणायचे असून दिल्या वेळेत तयार करायची आहे. यावेळी लोकमत सखी मंच २०१६ ची सभासद नोंदणी करण्यात येणार असुन नोंदणी करणाऱ्या सखींना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे तसेच भारती ठाकरे ९८५०५९६४६२, वंदना मुनघाटे ८८०६६२१०११, मालती कुचनवार ९६६५४९४०४०, मंजुषा भिमनवार ९८८१७२८६८७, अंजु चिकटे ९८९०३०४५७३, ज्योती पडिशालवार ९४२०४४६६५१, पूजा पडोळे ८८०५९८५५९२, स्नेहा धानोरकर ७६२०३०५९०३, किरण बल्की ९८६०९०११२४, सरिता मालू ९८५०४७१७०५, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८, अर्चना मेहेरे ९४२२०१२२८८, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७, ज्योती दिनगलवार, ७७२००९९८९३, सोनाली धनमने ७२७६९७५५९, बिंदिया वैद्य, ज्योती एकोणकर, योगिता कुंटेवार ९४२३४९७९०१, भानुमती बडवाइक ८०८७३८७६०५ मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, रेखा बोबाटे ९७६६०१९८९५ यांच्याशी संपर्क साधावा. (स्थानिक प्रतिनिधी)
मूल येथे तालुकास्तरीय सखी महोत्सव उत्साहात
By admin | Updated: February 13, 2016 00:42 IST