लखमापूर : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यातच दहावी व बारावीचे निकाल घोषित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयामध्ये गर्दी वाढत आहे. अशीच गर्दी तलाठी कार्यालयामध्ये सर्वत्र दिसत आहे. परंतु कार्यालयामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांंना तासन्तास उभे राहावे लागत आहे, तर कुठे पिण्याचे पाणी मिळत नसून उन्हाचे चटके सहन करीत गर्मीमध्ये कागदपत्रासाठी वाट पाहावी लागत आहे.शेतकर्यांना शेतीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येत आहे. यासाठी शेतीचा सातबारा आणि ‘अ’ प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. त्यामुळे भर उन्हात शेतकरी कार्यालयात जाऊन कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. तालुक्यातील गावांची संख्या व लोकसंख्या बघून तलाठी साजाचे केंद्र काही गावामध्ये देण्यात आले आहे. यापूर्वी गावातील एखाद्याच्या घरी हे कार्यालय असयाचे. तलाठी गावात तिथेच एखाद्या छोट्या खोलीत मुक्कामाने राहायचे, ही अडचन बघून सन २000 नंतर शासनाने तलाठी कार्यालयासाठी लाखोचा निधी मंजूर केला आणि कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले. कोरपना तालुक्यात तीन खोल्या बांधण्यात आल्या. समोरील खोली कार्यालयासाठी, मधात तलाठय़ांना राहण्याची खोली व आतील खोली स्वयंपाकघर म्हणून बांधण्यात आली. मात्र कार्यालयाचे र्मयादित आकारमान, वाढत्या भौतिक सुविधा यामुळे कुणीच तलाठय़ाने कार्यालयात राहणे पसंत करीत नाही. यातही कार्यालयाचे वीज भाडे तलाठय़ांनी भरावे असे निर्देश त्यांना असल्याचे समजते. त्यामुळे अनेक कार्यालयातील वीज पुरवठा बील न भरल्याने खंडित झाला आहे.कोरपना तालुक्यात नऊ तलाठी कार्यालय आहे. मात्र बहुतांश कार्यालयात वीज, पाणी व बैठक व्यवस्था नाही. त्याचबरोबर कार्यालय पसिरात घाण पसरलेली दिसते. कागदपत्रासाठी आलेले नागरिक परिसरातील झाडाचा आडोसा घेऊन प्रतिक्षा करतात.एकाचवेळी कागदपत्रांसाठी झुंबड उडत असल्याने दिवस घालवावा लागत आहे. यासाठी शासनाने ई-सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी नेटवर्कचा अभाव आणि तंत्रज्ञान माहितीच्या अभावाने शेतकरी गावतील तलाठी कार्यालयाकडे आजही धाव घेताना दिसत आहे. (वार्ताहर)
तलाठी कार्यालये मूलभूत सुविधांविना
By admin | Updated: May 31, 2014 23:23 IST