शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा

By admin | Updated: December 16, 2015 01:19 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अर्थ व नियोजन,

मुनगंटीवार यांचे निर्देश : नागपुरात पार पडली आढावा बैठकचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात प्रलंबित असलेल्या विषयांवर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अर्थ व नियोजन, वन मंत्री तथा चंद्र्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्यात. नागपूर येथील सेमिनरी हिल येथील वन सभागृहात आयोजित बैठकीत चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित विषयांचा आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, राजीव मिश्रा, डॉ. संजयकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, कक्ष अधिकारी ए. एम. डहाळे, एस.एन. योगे, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जैस्वाल, पी. के. इंगोले, एस.एस. परांजपे आदींची उपस्थिती होती. बैठकीत शासकीय वैद्यकीय व रूग्णालय, चंद्रपूर येथील नवीन अभिहस्तांकीत केलेल्या २० हेक्टर जागा व जोड रस्त्यासाठी वेकोलिचे ना हरकत प्रमाणपत्र व प्रस्तावित जागेवर नवीन इमारतीच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता, प्रस्तावित नवीन जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणूक करण्याबाबत, क्षय रूग्णालय परिसरात पदवीपूर्व मुला-मुलींकरीता वसतीगृह इमारतीच्या कामकाजाबाबत पाठपुरावा, परीक्षागृह व विद्यार्थी खानावळीचे बांधकाम, भविष्यात बल्लारपूर येथे आंतरवासियता (इंटर्नशिप) प्रशिक्षणाकरिता, निवासस्थान व खानावळीसाठी इमारत बांधकाम, प्राणीगृह बांधकाम, महाविद्यालयातील रिक्त पदे, फर्निचर, सुरक्षा रक्षक आदीविषयांचा सविस्तर आढावा सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. तसेच महाविद्यालयाची कामे प्राधान्याने करण्यात येऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिल्या. प्रास्ताविक डॉ. संजय कुमार यांनी करून विषयवार सविस्तर माहिती यावेळी सादर केली. (प्रतिनिधी)