शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

भरारी घ्या, पण मातृसंस्कृती जपा

By admin | Updated: February 4, 2016 01:02 IST

विद्यार्थ्यांनो, आयुष्यात कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जा. देशात व परदेशात उच्चपदस्थ अधिकारी व्हा.

भुप्ता यांचे आवाहन : बल्लारपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवबल्लारपूर : विद्यार्थ्यांनो, आयुष्यात कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जा. देशात व परदेशात उच्चपदस्थ अधिकारी व्हा. वंचितांसाठी काम करण्याची मानसिकता ठेवा. यशापयशाच्या ताणतणावाच्या वेळी संयमाने वागा. समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करा, यशाची उंच भरारी घ्या. पण विद्यार्थ्यांनो मातृ संस्कृतीचे जतन करा, असे भावनिक आवाहन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नवीनचंद्र भुप्ता यांनी सोमवारी गुरुनानक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात केले.बल्लारपूर येथील गुरुनानक विज्ञान महाविद्यालयात गुरुनानक दिवस व महाविद्यालय दिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ स्थानिक सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर गुरुनानक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जी. वेगिनवार, उपप्राचार्य उदय काळे, संयोजक प्रा.शोभा गायकवाड (नगराळे), प्रा.अपर्णा दुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य एन.सी. भुप्ता यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून व गुरुनानक देव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रा.डॉ. विजय सोरते, उपप्राचार्य उदय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान महाविद्यालयात व गोंडवाना विद्यापिठातून विज्ञान शाखेत प्रथम आलेली खुशबू शेख हिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे तृप्ती मिराणी, प्रियंका भुक्या, रुकसार अली, संजीवणी लांडे, अविष्कार २०१५ मध्ये पूर्ण येथे भाग घेतल्याबद्दल कोमल जानवे, कविता बल्लव, आकांक्षा द्विवेदी, प्रगती सूर्यवंशी, मोहनकुमार शर्मा, निशा खान, कृशकांत ओझा, वैभव मृत्यलवार, दिलीप अडवाणी, आरती त्रिपाठी, अंकिता चौधरी, कल्याणी शाहू, बिल्कीस शेख, तन्मयी बावगे, श्रेया गोयल, स्वर्णदीप चंदन आदी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.जी. वेगीनवार यांनी केले. संचालन प्रा.अर्पना दुर्गे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)