विकास कामांकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष
चंद्रपूर : शहरातील विविध वार्डात समस्या असतानाही त्या सोडविण्यासाठी नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. समस्या सोडवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
नाव नोंदणीसाठी केली सुविधा
चंद्रपूर : कोरोना लसीकरण केले जात आहे. मात्र काही ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नसल्यामुळे येथील नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी पुढाकार घेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हनुमान मंदिर परिसरात दुर्गंधी
चंद्रपूर : येथील जटपुरा गेट परिसरात असलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परसिरातील नाहिरकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देवून स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी केली जात आहे.
नळ योजनेचे काम त्वरित करावे
चंद्रपूर : शहरातील विविध वार्डामध्ये अमृत योजनेचे काम सुरु आहे. यासाठी रस्त्याचे खोदकान केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नळयोजनेचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
नागपूर रो़डवर अपघाताची शक्यता
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर रोडवरील विद्यानिकेतन शाळेजवळ मोठ्या प्रमाणात काही नागरिक आले असून ते व्यवसाय करून पोट भरत आहे. मात्र रात्री रस्त्याच्या कडेलाच झोपत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
मास्कची बेभाव विक्री
चंद्रपूर : कोरोनामुळे मास्क अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक जण मास्क खरेदी करीत आहे. मात्र शहरातील काही औषध विक्रेते मास्कची बेभाव विक्री करीत आहे. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
व्यावसायिकांची चिंता वाढली
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे.त्यातच शेजारील जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे आपल्याही जिल्ह्यात लाॅकडाऊन होईल, या भितीने जिल्ह्यातील व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. किमान यावर्षी लाॅकडाऊन करू नये, अशी त्यांची मागणी आहे.
रिकाम्या भुखंडाचा विकास करावा
चंद्रपूर : शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिकामे भुखंड आहे. यातील काहींचे आरक्षणही आहे. मात्र विकास झाला नसल्याने तिथे केचकचरा साचला आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देवून विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर: दिवसेंदिवस चंद्रपूर शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत कचरा संकलकांची संख्या कमी आहे. त्यामुळे असलेल्या कचरासंकलकांवर अतिरिक्त भार पडत आहे. याकडे लक्ष देवून संख्या वाढवून कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी केली जात आहे.
मास्कशिवाय कर्मचाऱ्यांचा वावर
चंद्रपूर : येथील गांधीचौकातील महापालिकेतील कार्यालयामध्ये काही कर्मचारी मास्क न लावताच कार्यालयात काम करीत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर दंड आकारून त्यांना मास्क लावण्यासंदर्भात सांगावे, अशी मागणी केली जात आहे.
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे.
कर वसुली जोरात
चंद्रपूर: मार्च महिना असल्यामुळे ३१ मार्चपर्यंत अधिकाधिक कर वसुल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी विविध झोन नुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाजारातील अतीक्रमण हटवावे
चंद्रपूर : येथील गोल बाजारातील अतीक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या बाजारात अनेकांनी अतिक्रमण करून रस्त्येच बळकावले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
इरई नदीची स्वच्छता करावी
चंद्रपूर : येथील इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. त्यामुळे नदीप्रवाह बदलण्याची शक्यता आहे. प्रशासन तसेच सामााजिक संस्थांनी झुडपे तोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.