शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कंत्राटदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:48 IST

पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्ह्यातीत रस्ते बांधकामाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पहिल्याच पावसामुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने लोकांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या अपघातासाठी संबंधित कंत्राटदारांना दोषी ठरवून कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकून कामे नाकारावीत, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.राजुरा लक्कडकोट तसेच गडचांदूर-कोरपना मार्ग केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत बांधलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसामुळे दुरवस्था झाली. हे रस्ते वाहतुकीयोग्य नसून अपघातांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली. अपघात टाळण्याकरिता या रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्याला केल्या. राजुरा-लक्कडकोट मार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपअभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले हा प्रकार गंभीर असल्याचेही असेही ते म्हणाले. गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या बांधकामाची चौैकशी करून संबंधित कंत्राटदारांना कारवाई करावी. राजुरा व बाबुपेठ येथील रेल्वे ओवरब्रिज कामाचाही या बैठक आढावा घेतला. या कामाची गती वाढविण्याच्या सुचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. यावेळी महापौर अंजली घाटेकर, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुले सराफ आदी उपस्थित होते.आदिवासी वसतिगृह हस्तांतरित होणारराजुरा व चंदनखेडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने हे दोन्ही वसतिगृह संबंधित विभागाकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही करावी. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा उपयोग घेता येईल. केवळ उद्घाटनाचे औचित्य पुढे करून विद्यार्थी प्रवेश प्रलंबित ठेवू नये, अशा सुचनाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. राजुरा येथील रूग्णालयाच्या बांधकामासाठी पाच कोटींचे वाढीव अंदाजपत्रक अनावश्यक असल्याचे स्पष्ट करून बांधकाम पूर्णावस्थेत आल्याने उर्वरीत बांधकाम अल्प खर्चात करावे. ही इमारत आरोग्य विभागाला अविलंब हस्तांतरीत करण्यात येईल, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली.