शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत.

ठळक मुद्देमागणी : समता सैनिक दलाचे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. संविधानाची प्रत जाळण्याची घटना घडली आहे. समता सैनिक दलाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून संविधान जाळणाऱ्या विरुद्ध संताप व्यक्त केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान ऐतिहासिक आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निष्ठेने कार्य केले. त्यांनी आखलेल्या धोरणाचा देशाला विकासासाठी मोठा फायदा झाला. त्यांच्या कर्तृत्वाची आजही ओळख देशाला आहे. परंतु देशद्रोही कृत्य करणारे त्यांनी अथक प्रयत्नातून निर्माण केलेल्या संविधानाची प्रत जाळत आहेत. अशा समाज कंटकाविरुद्ध भारतीय संविधान जाळले म्हणून भारतीय कायदा १९७१ च्या अ‍ॅक्ट १२४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य बौद्धिक प्रमुख डॉ. भास्कर कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी समता सैनिक दलाचे डॉ. भास्कर कांबळे, मार्शल प्रदीप पुणेकर, आनंद दुबे, आनंदा कांबळे उपस्थित होते.सावलीत निषेधसावली : दिल्लीतील जंतरमंतर घटनेचा निषेध करीत त्या आरोपींवर कडक कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थायी समितीच्या वतीने ठाणेदार स्वप्निल धुळे यांना देण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्ष लता लाकडे, भावना बोरकर, गीरजा मानकर, कल्पना रायपूरे, हेमलता गेडाम, प्रभा गोंगले, रेखा गेडाम, पार्वता डोंगरे, मेश्राम, खोब्रागडे, सविता सेमस्कर, जयप्रकाश दुधे, राजू व्यास, सुनील गेडाम, रायपूरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस