शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ताडोबातील ‘माया’ने घातली मायानगरीच्या अभिनेत्रीला भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:22 IST

एकापेक्षा एक अजरामर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वहिदा रहेमान यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीने भुरळच घातली.

ठळक मुद्देलोकमतशी बातचित : अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक यांनी मनसोक्त लुटला ताडोबा सफारीचा आनंद

राजेश भोजेकर/राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतकोलारा गेट(ताडोबा) : एकापेक्षा एक अजरामर चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री वहिदा रहेमान यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीने भुरळच घातली. वय वर्षे ८० असतानाही विदर्भाच्या कडक उन्हात त्या सतत तीन दिवस जंगलभ्रमंतीवर होत्या. ताडोबातील व्याघ्र दर्शन आणि जंगल सफारीने आनंदून गेल्या. ताडोबा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी सोमवारी सफारीहून परत आल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली.नागपुरात गेल्या आठवड्यात ‘लोकमत’च्या सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड आवर्जून उपस्थित होते. यानंतर ते मुंबईला परत न जाता शनिवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. एका रिसोर्टमध्ये मुक्काम करून व्याघ्र दर्शन व जंगलभ्रमंतीचा मनसोक्त आनंद लुटला. पहिल्याच दिवशी पर्यटकांवर भुरळ घालणाºया ‘माया’ वाघिणीचे निवांत दर्शन घडल्याने वनभ्रमंतीचा आनंद द्विगुणीत झाला. सतत तीन दिवस जंगलसफारीवर होते. ताडोबा ख्यातीप्रमाणेच आहे. येथे वाघ बघण्याचा आनंद काही ओरच. ताडोबा हे एक निसर्गरम्य ठिकाणही आहे, असेही वहिदा रहेमान म्हणाल्या.वनमंत्र्यांनी केलेल्या सुधारणांचे कौतुकताडोबा हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे, असेही वहिदा रहेमान म्हणाल्या. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सुधारणा येथे आपणाला कळले. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्र दूत बनवून योग्यच केले. वाघ बचाव मोहिमेला गती मिळेल. पर्यटनात वाढ होईल, असे सांगतानाच अमिताभ बच्चन यांची मी मोठी फॅन आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ताडोबाचे निसर्गरम्य वातावरण व ‘माया’च्या निवांत दर्शनाने आपण समाधानी असल्याचेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वीय सहाय्यक शैलेश बैस यांच्या मार्फतीने वन्यजीव रक्षक अमोल बैस यांनी टिपलेले माया वाघिणीचे तिच्या बछड्यांसोबतचे छायाचित्र भेट दिले.