शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

ताडोबाची ख्याती सातासमुद्रापलिकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ‘ताडोबा’ असे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर रुबाबदार वाघ दिसतो. वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले ...

ठळक मुद्देवनमंत्र्यांनी घातली पर्यटन विकासात भर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा सुधारला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘ताडोबा’ असे नाव उच्चारले तरी डोळ्यासमोर रुबाबदार वाघ दिसतो. वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याची आज ओळख झाली आहे. मागील पाच वर्षात या व्याघ्र प्रकल्पात आमूलाग्र बदल घडून आले. निश्चितच हे बदल सकारात्मक आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची उंची वाढविणारे आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री होताच ताडोबाकडे गांभीर्याने लक्ष दिले. हा प्रकल्प देशातच नाही तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध व्हावा, विदेशातील पर्यटकही ताडोबातील वाघांकडे आकर्षित व्हावे, यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा आणखी विकसित केला. आज ताडोबाची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे.सेल्फी पार्इंट, अत्याधुनिक रिसोर्ट, आगरझरी बटरफ्लाय गार्डन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील दुपटीने वाढलेली वाघांची संख्या, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे, लाखोंच्या संख्येत विदेशी पर्यटकही दरवर्षी ताडोबाकडे आकर्षित होत आहेत. जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. ताडोबा हे पानझडीचे वन आहे. वाघ-बिबटयाशिवाय या उद्यानात आढळणाºया मगरी आणि गवा हे येथील मुख्य वैशिष्टय आहे. साधारणत: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात हे उद्यान वसलेले आहेत. ताडोबा प्रकल्प नैसर्गिक वनस्पती आणि जीवसृष्टीने समृद्ध आहे. येथे वाघ, बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठयानजीकच मचानाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याने जीवसृष्टी अनुभवण्याचा अपूर्व आनंद येथे मिळतो. ताडोबा अभयारण्यात पर्यटन निवासस्थानांचीही व्यवस्था असल्याने निर्सगाच्या सानिध्यात राहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. २०१८-१९ मध्ये ताडोबातील पर्यटकसंख्या सुमारे पावणेदोन लाखांवर पोहचली. यंदा चंद्रपूरचा पारा ४८ अंश सेल्सिअसवर गेला. तरीही पर्यटकांनी ताडोबाची पर्यटनवारी सोडली नाही.जंगलातील वृक्षतोडीला आळाताडोबा प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात अजूनही काही गावे वसली आहेत. जंगलाची मदत घेत येथील ग्रामस्थ राहत आहेत. स्वयंपाकासाठी वृक्ष तोड केली जाते. यामुळे जंगलाचा ºहास होतो. त्यामुळे दृरदृष्टी असलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व बफर क्षेत्रातील जंगलात मानवी हस्तक्षेप वाढू नये, यासाठी बफर क्षेत्रातील गावात एलपीजी गॅस कनेक्शन वाटप केले. सोलर लाईट उपलब्ध करून दिले. परिणाम चुलीवर स्वयंपाक बंद होऊन वृक्षतोडीला आळा बसला.‘फॅम टूर’चा सकारात्मक परिणामताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पर्यटकाचा ओघ वाढविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने शासनाने कंबरच कसली. यासाठी खास 'फॅम टूर'चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'ट्रॅव्हल्स एजन्ट्स व टूर आॅपरेटर्स'नी सहभाग घेतला. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहे.विद्यार्थ्यांना मोफत पर्यटनआॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ दरम्यानमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे 'चला ताडोबा' या योजनेच्या अनुषंगाने दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत निसर्ग पर्यटनाचा लाभ देण्यात आला व त्यांना डॉक्युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षण व वनसंवर्धनाबाबत जागृती निर्माण होऊन पर्यावरणाचे महत्त्व त्यांना समजेल, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी केलेला हा प्रयोग चांगलाच यशस्वी व इतर राज्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्याचबरोबर, अंध, अपंग व वृद्धाश्रमातील लोकांना मोफत निसर्ग पर्यटनाचा लाभ देण्यात आलेला आहे.वाघांची सख्या ४८ वरून ८६ वरताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबात पूर्वी ४८ वाघ होते. मात्र मागील पाच वर्षात ताडोबात वाघांची संख्या वाढून ती ८६ वर पोहचली आहे. ताडोबात वाघांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात वनमंत्री मुनगंटीवार आणि त्यांचा वनविभाग यशस्वी झाल्याचेच यावरून दिसते. मागील काही दिवसांपासून ताडोबातील पर्यटकांना आपल्या दोन बछडयासह वावरत असलेल्या माया नावाच्या वाघिणीने भुरळ घातली आहे. जागतिक दर्जाचे वाईल्ड लाईफ फिल्म मेकर, दिग्दर्शक असलेले नल्ला मुत्थू हे आता ताडोबातील माया वाघिणीवर माहितीपट तयार करीत आहे. यासाठी मागील दहा महिन्यांपासून ते ताडोबात आहेत. ताडोबावर असा माहितीपट तयार व्हावा, इतकी ताडोबाची कीर्ती होण्यामागे वनमंत्री मुनगंटीवारांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न आहेत, हे कुणी नाकारू शकणार नाही.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प