लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : भिसी ते चिमूर मार्गावर भिसीपासून आठ कि.मी.अंतरावर खापरी धर्मू गावाजवळील नागमोडी वळणावर सोमवारी दुपारी १.१० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटली.एमएच ३१ डीके ४४५४ असा कारचा क्रमांक असून यात धरमपेठ नागपूर येथील करंडे परिवार ताडोबाकडे जात होते. या अपघातात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही. या वाहनाव्यतिरिक्त आणखी दोन वाहन होती. आणि हे सर्व ताडोबा सफारीवर जात होते. आतापर्यंत या नागमोडी वळणावर बरेचदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, हे विशेष. असे असतानाही याकडे संबंधित विभागाने आजपर्यंत लक्ष दिले नाही.
ताडोबा पर्यटकांची कार पलटली
By admin | Updated: June 6, 2017 00:31 IST