शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबात दिसला काळा बिबटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:07 IST

कॅमेऱ्यामध्येही कैद : नवे आकर्षण; पर्यटकांनी आनंदाची बातमी सर्वत्र सांगितली

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मंगळवारी सायंकाळी पर्यटनासाठी आलेल्या बेल्जियम येथील परिवाराला काळा बिबट दिसला. प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनीही याला दुजोरा दिल्याने पर्यटकांसाठी आता वाघांसह काळा बिबट आकर्षण केंद्र ठरणार आहे.बेल्जियम येथील जीन फ्रॅन्काईस एर्नाट्स व ज्युलियट डिकास्टेकर हे कुटुंबीय स्वर्णा, झिया, रुबी या मुलींसह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आले आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी ताडोबाची सफारी केली. सफारी शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोळसा वनपरिक्षेत्रातील शिवणझरी परिसरात एका पाणवठ्यावर काळा बिबट असल्याचे दिसले. बिबट पाणी पितानाचे दृश्य ज्युलियट यांनी आपल्या व्हिडीओ कॅमेºयात टिपले. या वेळी त्यांच्यासोबत असलेले गाईड शालिक येरमे व जिप्सीचे चालक प्रफुल येरमे यांनीही हे दृश्य डोळ्यांत साठविले. अचानक झालेल्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाने सारेच आश्चर्यचकित झाले.ही मंडळी ताडोबा सफारीवरून बाहेर पडताच ही आनंदाची बातमी साºयांना सांगितली. ज्युलियट यांनी बिबटाचे केलेले चित्रीकरणही अनेकांनी बघितले. एका पर्यटकाने मोबाइलवर या काळ्या बिबट्याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर टाकल्यावर ते व्हायरलझाले. २०१४मध्ये ताडोबात काळा बिबट आढळून आल्याचीही नोंद आहे. मात्र, यानंतर ही दुसरीच नोंद असल्याचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काही दिवसांपूर्वी ओडिशा येथेही काळा बिबट आढळल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. ज्युलियटने आपण ताडोबात काळा बिबट बघितल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली. छायाचित्रही लवकरच टाकणार असल्याचे त्यात नमूद केल्याने पुन्हा वन्यजीव प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली. बुधवारी सकाळी अनेकांनी याची शहानिशा करण्यासाठी ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्पाच्या अधिकाºयांशी संपर्क केला.

टॅग्स :wildlifeवन्यजीव