शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

पर्यटनात ताडोबा प्रकल्पाची भरारी; अन्य देखण्या स्थळांची उपेक्षाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 14:44 IST

पर्यटन विकासाची वाढावी व्याप्ती : ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषी व ग्रामीण पर्यटनाला द्यावा बूस्टर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने यंदाही पर्यटन क्षेत्रात मोठी भरारी घेतली. देशी व विदेशी पर्यटकांची संख्या वाढतच आहे. मात्र, जिल्ह्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक, कृषी व ग्रामीण पर्यटनाला चालणारे, देणारे देखणे स्थळ तुलनात्मकदृष्ट्या उपेक्षित राहिले. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटन विकासाची व्याप्ती वाढविण्यासाठी या क्षेत्रांनाही बूस्टर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

ताडोबा व्याघ्घ्र प्रकल्पाची महती देशभरात पोहोचली. देशी व विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सफारीसाठी येत असल्याने ताडोबा व्यवस्थापनाला चांगला महसूलही मिळत आहे. अर्थबळ मिळाल्याने ताडोबा क्षेत्रात पर्यटकांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, कृषीवर आधार ग्रामजीवन, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले व सांस्कृतिक समृद्धी असताना या क्षेत्रांचा पर्यटन पोर्टफोलिओ विस्तार करण्याचीही नितांत आवश्यकता आहे. ग्रामीण पर्यटन, खेड्यातील कृषी जीवनशैली, ऐतिहासिक स्थळे व कलाकुसर यावर आधारित पर्यटनाशी निगडित नवे उपक्रम सुरू करण्याची संधी आहे. असे झाल्यास ग्रामीण आर्थिक विकासात भर पडून रोजगारालाही काही प्रमाणात चालना मिळू शकते. त्यासाठी जिल्हा पर्यटन विकास धोरणात या बाबींचा समावेश करून बूस्टर देण्यासाठी गरज. 

ही आहेत महत्त्वाची पर्यटन स्थळेभद्रावती जैन मंदिर, महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, गोंडकालीन किल्ला, परकोट, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, विजासन हिल्स, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, घोडाझरी वन्यजीव अभयारण्य, वढा, मोहुर्ली बटर प्लाय गार्डन, बल्लारपूर बॉटनिकल गार्डन, प्रेरणाभूमी आनंदवन आश्रम वरोरा, अड्याळटेकडी, सोमनाथ मूल, रामदेगी, चिमूर येथील बालाजी मंदिर. 

पर्यटन क्षेत्रातील नवा ट्रेंड ग्रामीण भागातील शेतात पर्यटन करण्याचा नवा ट्रेंड जिल्ह्यात सुरु झाला. पर्यटकांना निसर्गाच्या जवळ जाणे आवडते हे खरे आहे. पण, हा ट्रेंड अजूनही पूर्णतः रुजला नाही. शासनाकडून चालना मिळाल्यास या नव्या पर्यटनाचा लक्षवेधी विस्तार होऊ शकतो. जिल्ह्यातील पर्यटनात अलीकडे आलेला या देडला शासकीय योजनांचे बळ मिळाले पाहिजे. 

ताडोबातील विदेशी पर्यटक२०१८ - २०१९ : ८२०८२०१९ - २०२२ : ४१७२२०२० - २०२१ : १९०२०२१ - २०२२ : ४७७२०२२ - २०२३ : ६७६७

वढा तीर्थक्षेत्राला २५ कोटी चंद्रपूर तालुक्यातील वडा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील २५ कोटींच्या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. या तीर्थक्षेत्राला १८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा नियोजन समितीने 'ब' दर्जा प्रदान केला.

बॉटनिकल गार्डन ठरले लोकप्रिय विज्ञान व स्थानिक पर्यावरणाशी संलग्न उभारण्यात आलेल्या बल्लारपुरातील बॉटनिकल गार्डनमध्ये आता पर्यटकांची संख्या वाढली, तिथल्या पायाभूत सुविधा, माहिती, मनोरंजन व ज्ञानवर्धक साधनांमुळे आकर्षणाचे केंद्र ठरले. जिल्ह्याबाहेरून शेकडो पर्यटक या गार्डनला भेट देऊन आनंद घेत आहेत. 

प्रादेशिक पर्यटन विकास विभागंतर्गत पर्यटन स्थळ ताडोबा-मोहर्ली पर्यटन स्थळ, महाकाली मंदिर चंद्रपूर, सोमनाथ तहसील मूल, बालाजी मंदिर चिमूर, तहसील भद्रावती शहर पर्यटन स्थळ, तहसील ब्रह्मपूरी वनविभाग येथे वनपर्यटनाची कामे, शिवलिंग कालिपुत्र व नवनाथ मंदिर भलेशवर ब्रह्मपुरी. 

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर