शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा जंगल म्हणजे ‘लयच भारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:11 IST

मुंबईपासून चंद्रपूर, बल्लारपूर, भंडारा असा अनेकदा प्रवास केला. नागझीरा, नवेगांव (बांध) यासह महाराष्ट्रातील किल्ले, शिखर या ठिकाणावर आधारित दहा ते बारा पुस्तकांचे लिखाण केले आहे.

ठळक मुद्देमिलींद गुणाजी : ताडोबा सफारीदरम्यान ‘लोकमत’शी साधला संवाद

राजकुमार चुनारकर ।आॅनलाईन लोकमतचिमूर : मुंबईपासून चंद्रपूर, बल्लारपूर, भंडारा असा अनेकदा प्रवास केला. नागझीरा, नवेगांव (बांध) यासह महाराष्ट्रातील किल्ले, शिखर या ठिकाणावर आधारित दहा ते बारा पुस्तकांचे लिखाण केले आहे. मला जे दिसते, ते टिपतो व लिहितो. मी एक टॅव्हलर असल्यामुळे माझी भटकंती अशीच चालू राहील. दुसºयांदा ताडोबाला वाघ बघायला आलो. ताडोबाचे जंगल म्हणजे लयच भारी, असे गौरवोदगार हिन्दी,मराठी चित्रपट कलावंत मिलींद गुणाजी यांनी काढले.शनिवार व रविवार सलग दोन दिवस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी ते चिमूर तालुक्यातील नवेगाव गेटवर आले असताना लोकमतने सिनेअभिनेता मिलींद गुणाजी यांच्यासोबत दिलखुलास संवाद साधला.शासनाचे माजी वाईल्ड लाईफ व अ‍ॅडव्हेन्चरचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बासीडर असल्याने वाघाच्या होणाºया मृत्यूबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, वाघाच्या संवर्धनासाठी वनविभाग प्रयत्न करेलच. मी ताडोबाला वाघ बघायला आलो आहे. दोन दिवसांच्या सफारीमध्ये अनेक प्राणी बघितले. मात्र वाघराजा दिसला नाही. मात्र हे जंगल पाहूनच मी कमालीचा मोहित झाला आहे. हे जंगल आणि वाघ बघायला पुन्हा ताडोबाला येणार आहे. आतापर्यंत पपिहा, कामसुत्र, फरेब, देवदास, जोर, विरासत, सलमा पे दिल आ गया, या चित्रपटासह हिन्दी, मराठी अशा २५० चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आव्हानात्मक वगैरे असा काही विषय राहिला नाही. सतत काम करण्याची आता माझी इच्छा नाही. त्यामुळे एखादी ‘ग्रेट’ भूमिका आली तरच करणार, असेही गुणाजी म्हणाले. एका कापडाच्या मॉडेलिंगपासून सुरु झालेल्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. त्या संघर्षाने सोडविल्या आणि पुढे जात राहिलो. या क्षेत्रात सतत काम करीत राहावे लागते. नवीन कलावंतांनी मनापासून काम करीत रहावे, यश आपोआपच पदरात पडते, असा सल्लाही त्यांनी न्यू कमर्सना दिला.