शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव; अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन येणार

By राजेश मडावी | Updated: February 29, 2024 16:03 IST

तीन दिवस मेजवाणी : अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन उपस्थित राहणार

चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांना व्याघ्र दर्शनाची हमखास खात्री असलेल्या प्रसिद्ध ताडोबा-अंधारी प्रकल्पाच्या वतीने चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राउंडवर शुक्रवार (दि.१) पासून तीनदिवशीय ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आला. रविवारी (दि.३) महोत्सवाचा समारोप होणार आहे.राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यटन व स्थानिक नैसर्गिक वारशाला चालना देण्यास नावीण्यपूर्ण विविध उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला अनुसरून ताडोबा व्यवस्थापन व वन विभाग सज्ज झाला आहे.

महोत्सवासाठी अभिनेत्री हेमामालिनी, रविना टंडन, गायिका श्रेया घोषाल उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी वन्यजीव संवर्धनावर विविध चर्चासत्र व प्रदर्शन होणार आहे. या सत्रांमध्ये ग्रामविकास समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच मानव-वन्य प्राणी संघर्ष कमी करण्याबाबत चर्चा करतील. यावेळी निसर्ग प्रश्नमंजूषाही होईल. सायंकाळी उद्घाटन सोहळ्याला वन्यजीव सद्भावना दूत व सिनेअभिनेत्री रविना टंडन विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी पार्श्वगायिका श्रेया घाेषाल यांची संगीत संध्या होणार आहे. शनिवारी (दि.२) छायाचित्र कार्यशाळा, संवर्धन दौड, कुमार विश्वास यांचे कविसंमेलन व रिकी केज यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि.३) ट्रेझर हंट, चित्रकला स्पर्धा, सीएसआर परिषद, प्रश्नमंजूषा तसेच समारोप कार्यक्रमाला खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचा गंगा बॅलेट नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे. वन्यजीव संवर्धन व मानवी सहजीवनावर आधारीत ताडोबा महोत्सवात नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पHema Maliniहेमा मालिनी