शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आढळला टी-१६१ वाघाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 19:37 IST

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी-१६१ हा वाघ मंगळवारी सकाळी ८ वाजता आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळला.

ठळक मुद्देफेब्रुवारीमध्ये कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळली होती गळ्याभोवती जखम

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी-१६१ हा वाघ मंगळवारी सकाळी ८ वाजता आंबेउतारा नियतक्षेत्र, रानतळोधी वर्तुळ, कारवा क्षेत्रामधील वनखंड क्रमांक २९० मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळला.

एप्रिल २०१९ मध्ये टी-१९ या वाघिणीच्या १ नर व २ मादी अशा तीनही बछड्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. रेडिओ कॉलरचा शेवटचा सिग्नल ऑगस्ट २०१९ मध्ये प्राप्त झाला होता. त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये टी- १६१ हा नर वाघ व्यवस्थितपणे फिरत असल्याचे कॅमेरा ट्रॅपमुळे लक्षात आले, मात्र तांत्रिक दोषामुळे त्याची रेडिओ कॉलर काढून टाकता आली नाही. २०१९ मध्ये कॉलर काढण्यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही.

त्यानंतर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये अधून-मधून या वाघाचे फोटो मिळत होते. वाघाचे आरोग्य उत्तम दिसून येत होते. मात्र, फेब्रुवारी २०२२ मध्ये मिळालेल्या छायाचित्रात या वाघाच्या गळ्याभोवती जखम दिसून आली तेव्हापासून कॉलर काढण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले गेले परंतु घनदाट जंगलात तो सतत फिरत असल्यामुळे ते प्रयत्न अयशस्वी झाले. सोमवारी (दि.२९) आंबेउतारा ओढ्याजवळ हा वाघ दिसला होता. मात्र, त्याला पकडता आले नाही.

अशातच मंगळवारी शोधकार्यात असणाऱ्या पथकाला या वाघाचा मृतदेहच आढळला. शवविच्छेदनाकरिता त्याला चंद्रपूर येथील तात्पुरत्या उपचार केंद्रात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एकता शेडमाके, डॉ. राहुल शेंद्रे, ता़डोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्य डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी शवविच्छेदन केले. क्षेत्र संचालक यावेळी डॉ. जितेंद्र रामगावकर, कोअर विभागाचे उपसंरक्षक नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्षक महेश खोरे, कारवा वनपरिक्षेत्राधिकारी कृष्णापूरकर, कोळसाचे रामटेके उपस्थित होते. याबरोबरच प्रधान मुख्य वनसंरक्षक (व.जी.) यांचे प्रतिनिधी म्हणून बंडू धोत्रे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून मुकेश भांदककर उपस्थित होते. शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे रक्तदोष उद्भवला. वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण कळेल.

टॅग्स :TigerवाघTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प