सुजाता काळे : महिला संघाचे अधिवेशनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांनी आपल्या आर्थिक सक्षमतेसाठी प्रयत्न केले पाहिजे. महिलांनी सत्यवानाची सवित्री नाही तर ज्योतिबाची सावित्री झाले पाहिजे. यावेळी त्यांनी महिलांना विविध उदाहरण देऊन महिलांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण केल्याशिवाय भारतात व्यवस्था परिवर्तन शक्य होणार नाही, असे प्रतिपादन मूलनिवासी महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुजाता काळे यांनी केले.स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे ६ वे जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. अधिवेशनाचे उदघाटन अॅड. वैशाली टोंगे याच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशोधरा पोतनवार, मीरा धनविजय, भरती रामटेके, प्रियंका गेडाम, उषा भोयर, सुमन चांदेकर, सुग्रा फातिमा खान, शहीद शेख, अल्का मोटघरे आदी उपस्थित होते. काळे पुढे म्हणाल्या, आॅल इंडिया डिप्रेस्ड क्लासेसचे राष्ट्रीय अधिवेशन २० जुलै १९४२ ला डॉ. बी.आर. आंबेडकर यांनी घेतले होते. या अधिवेशनात २५ हजार महिला डेलिगेट्स हजार होत्या. त्या काळात अशिक्षित व अधिकारविहीन महिलांनी आम्हा महिलांना सामाजिक व राजकिय हक्क आणि अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. मात्र आपण कर्तव्याची जाणीव विसरल्यामुळे आमच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना भरती कांबळे तर संचालन करूणा चालखुरे व आभार डॉ. अभिलाषा गावतूरे यांनी केले.
राष्ट्रव्यापी संघटनेशिवाय व्यवस्था परिवर्तन अशक्य
By admin | Updated: June 20, 2017 00:35 IST