शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

काँग्रेसजनांचे चंद्रपुरात लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:59 IST

केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशात सांप्रदायक सदभाव बिघडला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेत असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. दलित व शोषित यांच्यावर अन्याय होत आहे.

ठळक मुद्देदिवसभर धरणे : भाजपा सरकारच्या धोरणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशात सांप्रदायक सदभाव बिघडला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेत असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. दलित व शोषित यांच्यावर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरात दोन ठिकाणी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे तर माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात राजीव गांधी कामगार भवनात हे आंदोलन झाले.देशातील सामाजिक सदभाव टिकवण्यासाठी व चांगले सदभावाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार ठिकठिकाणी असे आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात जटपुरा गेटजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विधानसभेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर, माजी आमदार अ‍ॅड. अविनाश वारजूकर, जि.प.चे गटनेते डॉ. सतीश वारजूकर, नगरसेविका सुनिता लोढिया, नंदा अल्लूरवार, डॉ. आसावरी देवतळे, प्रकाश पाटील मारकवार, घनश्याम मुलचंदानी, विनायक बांगडे, दिनेश चोखारे, महेश मेंढे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा राव, विनोद दत्तात्रय, आदी उपस्थित होते.दुसरीकडे काँग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता राजीव गांधी कामगार भवनात आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, नगरसेवक डॉ. सुरेश महाकुलकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, मनपा नगरसेवक कुशल पुगलिया, नगरसेवक देवेंद्र बेले, अशोक नागापुरे, प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, जिल्हा परिषद सदस्य गोदरूपाटील जुमनाके, गजानन गावंडे, सुधाकर कुंदोजवार, तारशिंग कलशी, रामभाऊ टोंगे, सुधाकरसिंग गौर, शिवचंद काळे, नासीर खान, मेघा भाले, अश्विनी खोब्रागडे, नगरसेविका सकिना अन्सारी, विना खनके, ललिता रेवलीवर, वैशाली पुलावर, अनुश्री दहेगावकर, दुगेश चौबे, चंदू पोडे, पवन मेश्राम, कृष्णा यादव, विरेंद्र आर्य, राजू यादव, अरुण बुरडकर, विलास हिवरे, मुकुंद आंबेकर, अनिल तुंगडीवर आदी उपस्थित होते.अन् स्टेजच कोसळलायेथील जटपुरा गेट येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या मागे काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारच्या आंदोलनासाठी एक छोटेखानी स्टेज बनविला होता. आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झाल्यानंतर या स्टेजवर सर्वजण विराजमान झाले. मात्र स्टेजवरील वजन वाढल्यामुळे अचानक स्टेज कोसळला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर स्टेजची दुरुस्ती करण्यात आली.काँग्रेस जातीय दंगलीतील भयभितांच्या पाठीशी-वडेट्टीवारमागील तीन वर्षांत देशात १२६ जातीय दंगली घडल्या. यामध्ये निरपराध माणसांचा बळी गेला. केंद्र व भाजपशासित राज्यात जातीय सलोखा बिघडला आहे. माणसामाणसांमध्ये तेढ व वैमनस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या जातीय दंगलीत बिहारमधील दंगलीत एका मंत्र्याचा मुलाचा समावेश होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारे यांनीही आता भाजपबाबत पुनर्विचाराची भूमिका घेतली आहे. मागील महिन्यात देशात निर्माण झालेले अस्थिरतेचे वातावरण निवळण्यासाठी काँग्रेस पक्ष हा यामुळे भयभीत झालेल्या माणसांच्या भक्कमपणे पाठीशी आहे, यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार हे एकदिवसीय उपोषण करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.ही तर सुरुवात -नरेश पुगलियाअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा गोरगरिबांवरील अन्यायाविरोधात आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. त्यांच्याच आवाहनानुसार देशभरात हे आंदोलन झाले आहे. ते स्वत:ही दिल्ली येथील राजघाटवर उपोषणाला बसले आहे. आंदोलनांची ही सुरुवात आहे. सरकारच्या अन्याय, अत्याचार विरोधात सातत्याने आंदोलन करून सरकारचा निषेध केला जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली.