आॅनलाईन लोकमतआवाळपूर : नजीकच्या बिबी ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका अभिनव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हळदी-कुंकू कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन करून महिलांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. स्मिता चिताडे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य सविता काळे उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे समन्वयक सोपान नागरगोजे, अल्ट्राटेकच्या सोनाली गवारगूर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रा.पं. सदस्य संगिता ठाकरे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी महिलांना स्वच्छतेवर व शौचालय वापरावर मार्गदर्शन करून स्वच्छतेची शपथ दिली.उपस्थित महिलांसाठी उखाणे स्पर्धा, स्ट्रा-बॉल, बकेट-बॉल व इतर स्पर्धा घेण्यात २२२२आल्या. अतिथींच्या हस्ते महिलांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन भारती पिंपळकर हिने केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार स्वाती देरकर हिने मानले. यावेळी सुलोचना टोंगे, अनिता ढवस, कविता कुमरे, निर्मला गिरडकर, अल्का पिंगे, प्रतिभा पावडे, पूजा खोके, विजया मिलमिले, शीतल पावडे, कोमल अतकारे, गुड्डी अतकारे यांच्यासह गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
महिलांकडून स्वच्छतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:53 IST
नजीकच्या बिबी ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त एका अभिनव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
महिलांकडून स्वच्छतेची शपथ
ठळक मुद्देबिबी ग्रामपंचायतचे आयोजन : मकरसंक्रांतीचा अभिनव सोहळा