शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

स्वच्छ भारत अभियान केवळ देखावा

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही

खांबाडा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही परिसरातील अनेक कार्यालये व गावातील रस्त्यावरची घाण स्वच्छ झाली नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान खांबाडा परिसरात केवळ देखावा ठरत असल्याचे बोलले जात आहे. महात्मा गांधी जयंती दिनापासून शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयासह शहरात व ग्रामीण भागात हे अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आपापल्या भागात स्वच्छता अभियान राबविली. मात्र ही मोहीम केवळ एक दिवसापुरतीच मर्यादित राहिली. हातात झाडू घेऊन छायाचित्र काढून केवळ देखावा निर्माण करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये पुन्हा कचरा व घाण दिसून येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वत: परिश्रम घेऊन स्वच्छतेचा उपदेश केला. त्यामुळे त्यांच्या सांगण्याचा प्रभाव पडून त्याचे विचार नागरिकांनी आत्मसात केले होते. शासकीय कार्यालयातील शौचालयाची अवस्था बघूनच शौचालयाला न गेलेले बरे, असा विचार येतो.गुटखा, तंबाखू, सिगारेट, बिडी यामुळे आणखी घाणीचे साम्राज्य वाढत आहे. शासकीय परिसर, आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्रसुतिगूह, पशुवैद्यकीय दवाखाने तसेच तलाठी कार्यालयाचे परिरसर हे बघण्यासारखे आहेत. शासन स्वच्छतेसाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.परंतु शासकीय यंत्रणा व नागरिकांमध्येच उदासीनता दिसून येत आहे. अनेक गावात अद्याप रस्त्यावरच शौचविधी आटोपला जातो. जोपर्यंत पदाधिकारी अधिकारी व जनता आपली मानसिकता बदलविणार नाही, तोपर्यंत गावे स्वच्छ होऊ शकणार नाही.त्यामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)