शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

४० पट कर आकारण्याच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:45 IST

शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश : व्यापारी शिष्टमंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या या बैठकीत शहरातील व्यापारी शिष्टमंडळ सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असणाºया जुन्या मालमत्तांना अचानक मोठ्या प्रमाणात कर आकारणी करण्यात आली आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. सोमवारी शिष्टमंडळाने भेट घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यामध्ये तोडगा काढावा, अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महपौर अंजली घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अभय जोशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.यावेळी व्यापारी व अधिकारी या दोघांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाºयांना आपल्या नियमित वापराच्या मालमत्तेसाठी इतक्या मोठया प्रमाणात कर आकारणे योग्य नसून तूर्तास हा कर वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या निर्णयाबद्दल व्यापाºयांनी समाधान व्यक्त केले असून शासनाने योग्य पध्दतीने कर आकारणी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जलशुद्धीकरणासाठी पाच कोटीचंद्रपूर शहरातील उन्हाळयातील पाण्याचे संभाव्य दूर्भिक्ष लक्षात घेता तातडीची पाणी पुरवठा लाईन टाकण्यासाठी व शहरात विविध ठिकाणी हातपंप, कुपनलिका, विहिरीवर पंप बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर अंजली घोटेकर यांनी केली होती. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी आपल्या तातडीच्या दौºयात या निधीला मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी अधिकाºयांशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी कामडे, नगरसेवक रवी आसवानी, राजू गोलीवार उपस्थित होते. यावर्षी शहर व जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तरी शहरातील पाणी पुरवठा नियमित स्वरुपात व्हावा. त्यामध्ये अनावश्यक कपात करु नये, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे मार्च महिन्यातही महानगरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. तथापि, आगामी काळात शहरामध्ये पाण्याची मागणी वाढणार असून त्यासाठी माडा जलशुध्दीकरण केंद्र ते रामनगर जलशुध्दीकरण केंद्र असे पाणी पुरवठयाचे काम करायचे आहेत. यासाठी तीन कोटी आठ लाख रुपये तर आवश्यकतेनुसार शहरातील विविध ठिकाणी हात पंप, कुपनलिका, विहीरवर पंप बसविण्याचे काम महानगरपालिकेने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी निधी देण्याचे मान्य केले आहे.