जाहीर सभा : विविध कामगार संघटनांनी केला निर्धारलोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामधील कंत्राटी कामगारांचे वेतन निश्चित करण्याकरिता शासनाच्या वतीने रानडे व भाटिया यांच्या नेतृत्वात वेतन वाढ कमेटी गठित करण्यात आली. वेतन वाढीचा प्रस्ताव कमेटीच्या वतीने तयार करण्यात आला. मात्र शासन त्याची अंमलबजावणी करण्याचे दृष्टीने टाळाटाळ करीत असल्यामुळे महाराष्ट्रातील ३२ हजार ठेका कामगारांनी २२ मेपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाला पाठिंबा देण्याकरीता मेजर गेटसमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तसेच जेष्ठ कामगार नेते नरेश पुगलिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिटूचे महासचिव रमेशचंद्र दहीवडे, महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर पोडे, बल्लारशाह पेपर मिल कामगार संघटनेचे वसंत मांढरे, जिल्हा परिषदेचे शिवचंद्र काळे, एल. अॅड. टी. कामगार संघटनेचे साईनाथ बुचे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात नरेश पुगलिया म्हणाले, तुम्ही एकटे नाही. विविध उद्योगातील इंटकच्या नेतृत्वातील कामगार संघटना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्याचे दृष्टीने मी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिले. प्रास्ताविक भाषणात प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, शासन नियुक्त केलेल्या वेतन वाढ कमेटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, या मागणीच्या पूर्ततेसाठी थर्मल पॉवर केंद्रामधील महाराष्ट्रातील ठेका कामगारांना संपावर जावे लागते, याचे काहीच कसे शासनकर्त्यांना वाटत नाही. मागणी पुर्ण होईपर्यंत निर्धाराने आंदोलन करा. चंद्रपूर जिल्हा सिआयटीयुचा आपणाला पुर्णता पाठिंबा आहे, असे प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले. सभेला एक हजाराहून जास्त कामगार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शंकर बागेसर यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेकरिता वामन बुटले, निताई घोष, संतोष निकोडे, पुरुषोत्तम आदे, दिनप्रकाश उराडे यांनी परिश्रम घेतले. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा
By admin | Updated: May 29, 2017 00:35 IST