शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मनोधैर्य योजनेचा ३०२ पीडितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:32 IST

बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देअत्याचारग्रस्त महिलांचा सन्मान : आतापर्यंत सात कोटी रुपये पीडितांना सुपूर्द

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना मानसिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा प्रचार-प्रसार पाहिजे तसा होऊ शकला नाही. तरीही पोलीस विभागाकडून काही अत्याचारग्रस्त महिलांची प्रकरणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. यातील ३०२ पीडितांना या योजनेंतर्गत मदत देऊन स्वाभीमानाने उभे राहण्यासाठी आधार दिला आहे.महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने कडक कायदे केले असले तरी अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. शिवाय अशा प्रकारामध्ये न्यायालयीन लढाई लढताना पीडित महिलेला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. बलात्कार पीडित महिलेला मानसिक व शारिरिक आधार देता यावा, तिचे मनोधैर्य वाढावे, तिला आर्थिक पाठबळ मिळावे व पुढचे आयुष्य स्वाभीमानाने जगता यावे, यासाठी राज्य शासनाने २०१३ मध्ये बलात्कार पीडित महिलेला आर्थिक सहाय्य देणारी ‘मनोधैर्य योजना’ अमलात आणली. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते.बलात्कार पीडित व अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेली व बळी पडलेले या योजनेच्या मदतीसाठी पात्र असतात. कोणत्याही वयाची पीडित महिला मदतीसाठी पात्र ठरते. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर १५ दिवसांत पीडित महिलेला या योजनेंतर्गत मदत देण्यात येते. एक ते तीन लाख रुपये मदतीची यात तरतूद आहे. योजना चांगली असली तरी या योजनेचा प्रचार-प्रसार पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही.अनेकांना या योजनेविषयी माहिती नाही. या योजनेतील प्रकरणे मंजूर करण्यासाठी एक समिती असते. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीने प्रकरणे मंजूर केल्यानंतर शासनाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे संबंधित प्रकरणातील पीडितांसाठी निधी दिला जातो. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ३०२ अत्याचारपीडित महिलांना सात कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रति महिला १ ते ३ लाखापर्यंतची ही मदत आहे. यात आणखी काही प्रकरणे मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून त्या प्रकरणातील पीडितांनाही लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मरसोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली, या मदतीमुळे अत्याचारग्रस्त महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आधार मिळाला आहे.पोलिसांनी उदासीनता बाळगू नयेमहिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अशा घटनामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. काही जणांनी तर समाजाच्या भीतीपोटी आपले आयुष्यही संपविले आहे. अशा घटनेतील पीडित महिला व युवतींना मानसिक पाठबळ देण्यासाठी मनोधैर्य योजना चांगला पर्याय आहे. मात्र या योजनेसाठी पीडितांची प्रकरणे पोलीस विभागाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाकडे पाठविली जातात. २०१३ पासून २०१७ पर्यंत जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मात्र मदत केवळ ३०२ जणांनाच मिळाली आहे. त्यामुळे पोलीस विभाग प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पाठविण्याबाबत उदासीन तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीस विभागाकडून मनोधैर्य योजनेसाठी प्रकरणे आल्यानंतर तत्काळ कागदपत्रांची तपासणी करून अहवाल मंजुरीसाठी पाठविला जातो. त्यानंतर पीडितांसाठी शासनाकडून निधी आल्यानंतर तो पीडितांना सुपूर्द केला जातो. आतापर्यंत ३०२ जणांना मदत करण्यात आली आहे.- विलास मरसोदे,जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, चंद्रपूर.