शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्रावर पुरवठा अधिकाऱ्यांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे. 

ठळक मुद्देस्वच्छता तसेच अन्य बाबींची केली चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यात शिवभोजन केंद्रामधून पार्सलद्वारे वितरण, अस्वच्छता तसेच लाभार्थ्यांना जेवण करू देत नसल्याबाबतची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत जिल्हा  पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी यांनी चंद्रपूर शहरातील काही शिवभोजन केंद्रावर धाड टाकत चौकशी केली. विशेष म्हणजे, धाडीमध्ये त्यांना केंद्रामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या. यामुळे अन्य शिवभोजन केंद्रसंचालकांचे धाबे दणाणले       आहे.जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहे. या माध्यमातून गरीब तसेच गरजूंना ३ हजार ७०० थाळींचे मोफत वितरण केले जाते. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाभार्थ्यांना भोजन वितरण न करता आपल्या सोयीनुसार केंद्रसंचालक लाभार्थ्यांना भोजन वितरण करीत आहे. विशेष म्हणजे, प्लास्टिक पिशव्यांमध्ये जेवन भरून पार्सलद्वारे दिल्या जात आहे. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका होण्याची शक्यता आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी गंजवार्ड भाजी मार्केटमधील एक, सरकारी दवाखाना परिसरातील दोन, जटपुरा गेट परिसरातील एका केंद्रावर गुरुवारी सकाळी धाड टाकली. यावेळी केंद्रसंचालकांनी सावरासावर करीत अधिकाऱ्यांना उत्तरे दिली. विशेष म्हणजे, अधिकाऱ्यांना अस्वच्छता तसेच काही ठिकाणी कचरा टाकण्यासाठी साधी डस्टबीनसुद्धा नसल्याचे दिसून आले. यावेळी स्वच्छता तसेच ठरवून दिलेल्या मानकानुसार भोजन देण्याच्या सूचना पुरवठा अधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना केल्या.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय