शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘सूर रायझिंग स्टार’ मधून चमकले उद्याचे ‘सुपरस्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:00 IST

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठाच न मिळाल्यामुळे अनेक अस्सल कलावंत समाजासमोर येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन ....

ठळक मुद्देकलर्स- लोकमत समूह उपक्रम : बहारदार सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध, लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षकांनी पारितोषिक जिंकले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठाच न मिळाल्यामुळे अनेक अस्सल कलावंत समाजासमोर येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या उद्याच्या सुपरस्टार्सना प्रकाश झोतात आणले जाते.सुरांचे देणे लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकमत आणि कलर्स वाहिनी आगळे-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’ चे असे त्याचे नाव कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात पार पडली. यामध्ये चार वर्षांपुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष आदींचा समावेश होता.कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, रमण बोथरा, आनंद नागरी सहकारी बँकेचे संचालक जितेंद्र चोरडीया, गोंडपिपरीचे तहसीलदार येरणे, बंटीभाई चोरडीया, राजेश चोरडिया, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, चंद्रपूर लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले उपस्थित होते. परिक्षक म्हणून भारती कदम, प्रफुल्ल कदम, प्रशांत डेहनकर, मुकेश कुमार, जित बिस्वास यांनी काम पाहिले.कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी विविध प्रकारची गाणी सादर केली. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेकांनी आपल्या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये तारे बाराती... लगना लगे, नैना ठग लेंगे, उगवती शुक्राची चांदणी, गारवा आदी गाण्यांचा समावेश होता.विशेष म्हणजे या प्रयत्नांना साथ मिळाली आहे ती कलर्स वाहिनीची. मनोजरंनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करुन छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घरांंमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. निखळ कौटुंबिक व संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमात उपस्थितांसाठी लक्की ड्रॉ काढण्यात आली. संचालन अमोल कडूकर यांनी केले. सोनम मडावी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऐश्वर्या खोब्रागडे, नेहा तांबस्कर, सचिन मडावी आदींनी सहकार्य केले.रायझिंग स्टारच्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे. भारतातील पहिल्या लाईव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचाराच्या चौकटी. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटीची आज काहीही गरज नाही. अशा चौकटीचे बंधने झुगारुन आपले टॅलेंट जगासमोर आणणाºया गायकांना चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटिंग करु शकतात. यामध्ये साथीला आहेत देशातील तीन सुप्रसिद्ध महारथी परिक्षक गायक व संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. तर मग या सिझनमध्ये केवळविचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार- रविवारी रात्री ९ वाजता सुरु होत आहे देशातील एकमेव लाईव्ह सिगिंग रिअ‍ॅलिटी शो रायझिंग स्टार...रायसिंग स्टार विजेतेप्रथम- विजय पारखीद्वितीय- प्रणाली पाटीलतृतीय- आदित्य शिंदेकरप्रोत्साहनपर- पूजा पारखी, ऐश्वर्या सातपुते, आशिष मेश्राम, आयुष झाडे, निकिता गोवर्धन, स्नेहल लहाने, सावी चहांदे.