शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

उन्हाची काहिली वाढली

By admin | Updated: March 27, 2016 00:32 IST

चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे.

दुपारी वर्दळ कमी : पारा ४० अंशापार, अडगळीतले कुलर निघाले बाहेरचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे. होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या पंधरवाड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला आहे. आता तर मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली चंद्रपूरकरांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४०.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल शुक्रवारीदेखील ४०.१ अंश सेल्सीयस तापमान होते. मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ४० अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे. उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सोडले तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक नानाविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे नागरिकांनी सुरू केले आहे.त्यामुळे टोप्यांची दुकाने, गागल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय चंद्रपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत. या रसवंत्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्याची पातळी खालावलीदुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणिकगड पहाडावरील अनेक गुड्यातील लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत.मडक्यांची मागणी वाढलीउन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार चाळीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहे. पूर्वी ४०-५० रुपयात मिळणाऱ्या माठाची किंमत आता शंभर-दीडशे रुपयांवर गेली आहे.होळीच्या आदल्यादिवशी सर्वाधिक तापमानहोळीच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ मार्चला चंद्रपुरात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. त्यानंतर सुर्याचा पारा कमी झाला. तरीही तो ४० अंशापार आहेच.