शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

अतिवृष्टीत घर कोसळलेल्या सुमनबाईचा घरकुलासाठी संघर्ष

By admin | Updated: November 15, 2015 00:41 IST

पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे वार्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास असलेली ...

वरिष्ठांनी दखल घ्यावी : वृद्धपणात झिजवीत आहेत कार्यालयाचे उंबरठेपोंभुर्णा : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवाडा खुर्द येथे २०१२-१३ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे वार्ड क्र. २ मध्ये वास्तव्यास असलेली अल्पभूधारक विधवा महिला सुमन गद्देकार हिचे संपूर्ण घर कोसळले. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या सुमनला शेजाऱ्यांनी आश्रय दिला. शासनाने दिलेल्या तुटपुंज्या मदतीने शेजाऱ्यांनी हातभार लावून छोट्याशा झोपडीची व्यवस्था करून दिली. त्या झोपडीत सुमनबाई आपले वास्तव करीत असून गेल्या दोन वर्षापासून ती घरकुलाच्या संघर्षात कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.सन २०१२-१३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने विटा मातीचे असलेले एक लाख रुपये खर्च करून बांधलेले सुमनबाईचे संपुर्ण घर कोसळले. सुमनबाईचे पती सिताराम गद्देकार हे सात वर्षापूर्वीच वारले. पतीच्या निधनानंतर ती एकटीच घरात वास्तव्यास राहत होती. तिला अपत्य नाही. तिची परिस्थिती फारच हलाखीची असून दोन वेळ पोटाची खडगी भरणेही तिला कठीण जात आहे. मोलमजुरी करून आपले कसेबसे जीवन जगत असताना तिच्यावर निसर्गाची अवकृपा झाली आणि पावसाने सुमनचे अख्खे घर पडले. तिच्यावर बेघर होण्याची पाळी आली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या पुरुषोत्तम घुघुस्कार यांनी तिला आपल्या घरात आश्रय दिला.या घटनेनंतर शासनाकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सुमनने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय गाठले आणि आपली आपबिती सांगितली. घर कोसळल्याने तिचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असले तरी तहसील कार्यालयाकडून मात्र तिला १ हजार ९०० रुपयांची तुटपुंजी मदत मिळाली. सुमनला अपत्य नसल्याने व अल्प शेती असल्याने वयाच्या ६७ व्या वर्षी मोलमजुरी करून तिला जीवन जगावे लागत आहे.दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या सुमनला एक हजार ९०० रुपयांत काय होणार असा प्रश्न पडला. त्यामुळे येथील जिल्हा परिषद सदस्य संगिता घोगडे व सामाजिक कार्यकर्ते निळकंठ नैताम यांनी तत्कालीन तहसीलदार राजेश सरवदे यांची भेट घेऊन सदर महिलेची आपबिती सांगितली. तेव्हा सरवदे यांनी प्रत्यक्षात सुमनबाईच्या पडक्या घराला भेट देऊन शासनाकडून १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे या महिलेला आपण घरकुल देऊ, असे आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु त्यांची मात्र पोंभुर्णा येथून बदली झाल्याने तिच्या घराचे स्वप्न अधुरेच राहिले. शासनाकडून मिळालेल्या १५ हजार रुपयांतून शेजारच्या व्यक्तींनी छतासाठी टिनांची व काही विटांची व्यवस्था करून दिली. एका झोपडीची व्यवस्था करून देण्यात आली आणि त्या झोपडीत ती वास्तव्य करीत आहे. आज ती म्हातारी झाली असल्याने तिला फिरणेही अवघड झाले आहे. मरणोत्तर काळामध्ये तरी घरकुल मिळणार काय, असा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुमनबाईला घरकुल द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)