शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शालूचा मोबाईल उलगडणार आत्महत्येचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:13 IST

घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांचे बयाण नोंदविले : पोलिसांकडून तपासाला गती, घुग्घुसवासीयांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घुग्घुस येथील भाजपच्या पंचायत समिती सदस्य शालू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सांगत आहे. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शालू शिंदे यांच्या मोबाईलच्या माध्यमातून पोलीस या प्रकरणातील रहस्य उलगडणार असल्याचे बोलले जात आहे.शालू शिंदे या आपल्या परिवारात आनंदी जीवन जगत होत्या, अशी माहिती चर्चेतून पुढे येत आहे. अशातच त्यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याने घुग्घुसमध्येच नव्हे, तर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आनंदी जीवन जगत असताना त्यांना आत्महत्या करण्याची गरज का भासली, असा प्रश्न जनतेला पडला आहे.त्यांच्या आत्महत्येमागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असल्याचा सूरही घुग्घुसमध्ये ऐकायला मिळत आहे. या प्रकरणी शालू शिंदे यांचे पती विवेक शिंदे यांनी शालू यांचा मोबाईल घुग्घुसचे ठाणेदार आमले यांना चौकशीसाठी ताब्यात दिला. तसेच पोलिसांनी घरातील मंडळींचेही बयाण नोंदवून घेतले आहे. मात्र याचा उलगडा करण्यास पोलिसांनी नकार दिला. यामुळे या घटनेचे रहस्य आणखीच वाढले आहे.चर्चेच्या आधारे शालू यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलवरून कोणाशीतरी संभाषण केले होते. यानंतर काहीवेळातच आत्महत्या झाल्याचेही बोलले जात आहे. या अनुषंगाने शालू यांच्या मोबाईलचे एकूणच कॉल डिटेल्स तपासात घेतले तर आत्महत्येच्या रहस्यावरून पडदा हटण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.एक पंचायत समिती सदस्य एकाएकी आत्महत्या करते. यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असावे, असा सूर असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून नेमके सत्य पुढे आणण्याचे आव्हान घुग्घुस पोलिसांपुढे आहे.