शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अभियंत्यांवर संपूर्ण कार्यालयाचा सुरु आहे डोलारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:19 IST

अख्या कार्यालयात केवळ एकच कर्मचारी : कोरपना येथील प्रकार

जयंत जेनेकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना: कोरपना येथे जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या कार्यालयाची स्थापना वर्षभरापूर्वी करण्यात आली. परंतु, उपविभागीय अभियंता व्यतिरिक्त एकाही कर्मचाऱ्याची अद्यापही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत कार्यालय नाममात्र ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सनियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे असते. तालुका निर्मितीच्या ३२ वर्षांनंतरही कोरपना येथे हे कार्यालय स्थापन करण्यात आले नव्हते. येथील कार्यभार राजुरा येथून चालविला जायचा. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यावर अतिरिक्त व्याप असल्यामुळे कामे कासवगतीने व्हायची. या कार्यालयसंबंधी काम असल्यास वेळ व आर्थिक बाब सहन करून राजुरा जावे लागायचे. हा होणारा त्रास लक्षात घेता जून २०२३ ला कोरपना येथे स्वतंत्र जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कार्यान्वित करण्यात आले.

यासाठी पंचायत समिती परिसरातील कर्मचाऱ्यांच्या सदनिकाची एक इमारतसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावाने सदर कार्यालय केव्हाही कुलूप बंदच दिसते. एकट्या उपविभागीय अभियंत्याचीच येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे राजुऱ्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.

अशी आहेत रिक्त पदेया कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची सहा पदे मंजूर असून यातील सहाही पदे रिक्त आहे. मंजूर असलेली ज्येष्ठ सहायक एक, कनिष्ठ सहायक दोन पैकी दोन, परिचरची दोन पैकी दोन ही पदे रिक्त आहे. यामुळे कार्यालयाचे कामकाज येथे अद्यापही प्रत्यक्षरीत्या सुरू होऊ शकले नाही. या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन येथील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अधिकारी एकच कामे सर्वच ....कोरपना येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपवि भागाचे जिल्ह्यातील एकमेव असे कार्यालय असावे. की जेथे प्रमुख अधिकाऱ्यापासून अगदी परिचरपर्यंतची कामे एकाच प्रमुख अधिकारी पदाच्या व्यक्तीला रिक्त पदामुळे सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे. हे ही विशेष, मात्र याचा कामावर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.

सिंचाई उपविभाग कधी स्थापन होणारकोरपना येथे जिल्हा परिषद बांधकाम, पाणीपुरवठा उपविभागाचे कार्यालय स्थापन झाली. परंतु सिचाई उपविभागाचे कार्यालय अद्यापही स्वतंत्ररित्या स्थापन झाले नाही. त्यामुळे या कार्यालय संबंधी कामे असल्यास राजुरा येथील कार्यालय गाठावे लागते आहे. स्वतंत्र कार्यालयअभावी तालुक्यातील सिचाईविषयक कामाला पाहिजे तशी गती सुद्धा मिळू शकत नाही, हे वास्तव आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर