शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:47 IST

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांची मागणी केली असून चंद्रपुरात पुस्तक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसाडेअकरा लाख पुस्तकांची नोंदणी : १ लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांची मागणी केली असून चंद्रपुरात पुस्तक दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच बंगाली भाषिक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे.जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, शासकीय, अनुदानित प्राथमिक शाळांमधील १ ते ५ वीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत प्रतिलाभार्थी २५० तसेच उच्च प्राथमिक शाळेतील ६ ते ८ वीत शिकणाऱ्यांना प्रति लाभार्थी ४०० रूपये दिल्या जाते.विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आता यू- डायस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यावरील विद्यार्थी संख्येच्या नोंदणीनुसार ई-बालभारती पोर्टल पाठ्यपुस्तकांची नोंदणी करण्याच्या सूचना समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालकांनी दिल्या होत्या.मागीलवर्षी राज्यातील ३५ जिल्हा परिषदांपैकी ५ आणि २२ पैकी ३ महानगरपालिकांनी विहित मुदतीत पाठ्यपुस्तकांची नोंदणी न केल्याने शैक्षणिक सत्र सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापासून वंचित राहावे लागले होते. यंदा अशी समस्या उद्भवू नये, याकरिता आॅनलाईन नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यात बंगाली माध्यमाच्या दोन शाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांनाही यावर्षिपासून पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाठ्यपुस्तके पंचायत समितीला पाठविणारविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून यंदा पंचायत समित्यांनी बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची परस्पर नोंदणी केली. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार १९६७ रोजी पुणे येथे बालभारतीची स्थापना झाली. मागीलवर्षी बालभारतीने राज्यभरात १ कोटी टेक्सबूक व अडीच कोटी वर्कबूक विद्यार्थ्यांना वितरीत केले होते. पोर्टलवर नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये ही पाठ्यपुस्तके थेट पुण्यावरून पाठविण्यात येणार आहे.