बाजीराव रामटेके : किरण वाचनालयाच्या वतीने गुणवंताचा सत्कारनवरगाव : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही बाब गौरवास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थीही मागे नाहीत. तो स्पर्धेत उतरला आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द आणि परिस्थितीची जाणीव ठेवावी, असे उद्गार प्रा. बाजीराव रामटेके यांनी काढले.सिंदेवाही तालुक्यातील किरण सार्वजनिक वाचनालय नाचनभट्टीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बाजीराव रामटेके होते. यावेळी ते बोलत होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दुश्यना बन्सोड, प्रा. अश्वीन जयस्वाल, धनोज खोब्रागडे आदी उपस्थित होते.प्रा. रामटेके म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असल्यास परिस्थिती आड येऊ शकत नाही. तो निश्चितच ध्येयाच्या आसपास पोहचतो. मुलगा म्हातारपणात आपल्या काठीचा आधार व्हावा, ही आई-वडिलांची अपेक्षा असते. त्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी त्यांची सेवा केली पाहिजे. त्याबरोबरच आपण समाजाचेही देणे लागतो. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे वेळेचे नियोजन करा. कारण बुध्दीमतेशिवाय आजचा विद्यार्थी टिकू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनोज खोब्रागडे, संचालन व उपस्थितांचे आभार वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष हरेश रामटेके, सचिव गौतम खोब्रागडे, वामन खोब्रागडे, अशोक रामटेके, महादेव खोब्रागडे, ग्रंथपाल भीमराव खोब्रागडे, मच्छिंद्र रामटेके, आनंदराव चहांदे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)सत्कार करण्यात आलेले गुणवंतकिरण वाचनालयाच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते दहावी व बारावीमधील सुरेखा हरेश रामटेके, प्रज्ज्वल देवानंद गेडाम, गौतमी मच्छिंद्र रामटेके, दिपाली अरुण चौधरी, पंकज प्रकाश बन्सोड, प्रतिक गेडाम, भारतीय कृष्णा चौधरी, करिष्मा वासुदेव मेश्राम, अपर्णा खोब्रागडे, रोहिणी खोब्रागडे, स्विटी सिध्दार्थ मेश्राम आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यापैकी पंकज प्रकाश बन्सोड या गरीब विद्यार्थ्याला यावर्षी एमबीबीएससाठी नागपूर येथे प्रवेश मिळाला आहे, हे विशेष.
विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवावी
By admin | Updated: November 5, 2016 02:12 IST